

गडहिंग्लजला चार टक्क्यांची वाढ
बारावी निकाल : ३९७६ विद्यार्थी उत्तीर्ण, पाच महाविद्यालयांची शंभरी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. गडहिंग्लज तालुक्याचा ९७.४५ टक्के निकाल लागला. निकालात गतवर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांची वाढ झाली आहे. तीन हजार ९७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पाच कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आज दुपारी एकला ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाला. बहुतांश विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकाल पाहिला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. गडहिंग्लज तालुक्यातील २६ महाविद्यालयांतून चार हजार ११७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील चार हजार ८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तीन हजार ९७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी ९३.७९ टक्के निकाल लागला होता. दरम्यान, ए. आर. देसाई तेरणी, साई इंटरनॅशनल शेंद्री, क्रिएटिव्ह गडहिंग्लज, सेंट झेवियर नेसरी, शिवराज गडहिंग्लज या महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला.
कनिष्ठ महाविद्यालयनिहाय निकाल असा : संभाजीराव माने गडहिंग्लज (९८.६८ टक्के), एम. आर. गडहिंग्लज (९९.६०), साधना गडहिंग्लज (९९.२१), जागृती गडहिंग्लज (९८.८६), गडहिंग्लज उच्च माध्यमिक गडहिंग्लज (९५.६६), महात्मा फुले महागाव (९८.९१), छत्रपती शिवाजी नेसरी (९६.५१), हलकर्णी भाग हलकर्णी (७९.२२), राजा शिवछत्रपती कानडेवाडी (९२.४२), न्यू इंग्लिश नूल (१००), हिडदुगी कनिष्ठ महाविद्यालय हिडदुगी (१००), राजर्षी शाहू गडहिंग्लज (९६.१५), भावेश्वरी हेब्बाळ जलद्याळ (९१.०७), केदारलिंग कडगाव (९६.९३), ए. आर. देसाई तेरणी (१००), भालचंद्र कुलकर्णी महागाव (९७.६१), दुरदुंडेश्वर मुत्नाळ (९९.०६), क्रिएटिव्ह गडहिंग्लज (१००), साई इंटरनॅशनल शेंद्री (१००), सेंट झेवियर नेसरी (१००), मराठा मंदिर गडहिंग्लज (९८.४३), शिवराज गडहिंग्लज (१००), साधना व्होकेशनल (८८.८८), जागृती व्होकेशनल (९२.९५), हलकर्णी भाग व्होकेशनल (८५.७१), रुरल कॉलेज ऑफ फार्मा एज्युकेशन महागाव (९६.२९).
-----------
दृष्टिक्षेपात निकाल
विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण... ३५६
प्रथम श्रेणी........................ १५३४
द्वितीय श्रेणी..................... १८६०
उत्तीर्ण............................... २२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.