मोठे तळे सुशोभीकरण रखडले

मोठे तळे सुशोभीकरण रखडले
Published on

ich213.jpg
84975
इचलकरंजी ः मोठे तळे सुशोभिकरणाचे काम महिनाभर ठप्प आहे. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)

मोठे तळे सुशोभीकरण रखडले
मक्तेदारास नोटीस ः गतीने काम करण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २१ ः येथील संस्थानकालीन ठेवा असलेल्या मोठे तळे सुशोभीकरणाचे काम महिनाभरापासून ठप्प आहे. या कामाची अद्याप मुदत संपलेली नाही. तथापी, समोर पावसाळा आहे. त्यामुळे हे काम दीर्घ काळ रखडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मक्तेदार कंपनीस नोटीस काढली आहे. यामध्ये तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संस्थानकालीन ठेवा असलेल्या मोठे तळ्याचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते. सुरुवातीला लोकसहभागातून या ठिकाणाचे सुशोभीकरणाचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेतून २ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली. पुण्याच्या अरबाज कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर केली आहे. सुरुवातीला अनेक अडथळे दूर करून या कामाची सुरुवात केली. हे काम गतीने सुरू असतानाच मध्यंतरीच्या काळात थांबले.
शासनाकडून निधी मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे मक्तेदाराचे बिल दिले नाही. त्यामुळे मक्तेदाराने हे काम थांबवले. त्याला निधी दिल्यानंतर पुन्हा हे काम महिनाभर थांबले आहे. तोंडावर पावसाळा आहे. पावसाळ्यात काम करणे धोकादायक आहे. त्यामुळे हे काम मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. तथापि, विद्युतखांबाचा अडथळा येत आहे. त्याच्या स्थलांतरासाठी साडेचार लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले.
-----------
सुधारित अंदाजपत्रक तयार
विद्युत खांबाच्या स्थलांतराच्या कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यामुळे या कामाला गती येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीही सुशोभीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्याची नोटीस शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी मक्तेदार कंपनीस काढली आहे. त्यामुळे या कामाला गती येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com