

चंदगड तालुक्याचा बारावीचा ९६ टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ ः तालुक्यातील सोळा ज्युनिअर कॉलेजमधून विविध शाखांच्या बारावी परीक्षेचा निकाल ९६.४७ टक्के लागला. २२१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २१३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकाल जाणून घेण्याची उत्कंठा होती. परीक्षा बोर्डाने दिलेल्या वेबसाईटवरून अनेकांनी निकाल पाहिला. त्यानंतर मित्र, नातेवाईकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचे संदेश सुरू झाले. अनेकांनी स्टेटसला, तसेच फेसबुकवर पाल्यांचे गुणपत्रक झळकवून कौतुक केले.
तालुक्यातील विविध महाविद्यालयांचा निकाल असा ः न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड (९७.१७), विज्ञान १००, कला ८७.३०, वाणिज्य ९९.३५, गुरुवर्य म. भ. तुपारे ज्युनिअर कॉलेज मजरे कार्वे कला शाखा- १००, श्रीमान वाय. पी. देसाई कला आणि वाणिज्य ज्युनिअर कॉलेज (९१.२६). विज्ञान ९९.५२, कला ६९.४१, वाणिज्य ९३.२२, गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील ज्युनिअर कॉलेज (९८.५९). विज्ञान ९९.६४, कला ७७.७७, वाणिज्य १००, श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तुडीये (९५.१२). विज्ञान १००, कला ९०.६२, वाणिज्य ९६.८७, श्री सरस्वती ज्युनिअर कॉलेज कालकुंद्री (९१.५२). विज्ञान ९७.५०, कला ७८९४, सटुप्पा वाघमारे ज्युनिअर कॉलेज ढोलगरवाडी कला ८४.२१, धनंजय ज्युनिअर कॉलेज नागनवाडी (९९.२९). विज्ञान १००, कला १००, वाणिज्य ९७.०५, बागीलगे डुक्करवाडी ज्युनिअर कॉलेज (९१.४२). कला ७५, वाणिज्य १००, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज पाटणे कला ८८.८८, शिवशक्ती ज्युनिअर कॉलेज अडकूर कला १००, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणगाव कला १००, श्री सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेज कुदनूर कला ८५.७१, रवळनाथ ज्युनिअर कॉलेज चंदगड वाणिज्य १००, राजर्षी शाहू ज्युनिअर कॉलेज शिनोळी बुद्रुक (८३.३३). कला ८०, वाणिज्य १००. सह्याद्री ज्युनिअर कॉलेज हेरे (१००). विज्ञान १००, वाणिज्य १००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.