

कोल्हापूर रेल्वेच्या
प्रलंबित मागण्या पूर्ण करा
अरिहंत जैन फाऊंडेशनतर्फे निवेदन
कोल्हापूर, ता. २१ ः येथील रेल्वेच्या प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात, अशा आशयाचे निवेदन अरिहंत जैन फाऊंडेशनच्या वतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांना देण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल यांनी मंत्री दानवे यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत विनंती केली. कोल्हापूर-अहमदाबाद या रेल्वेला असणारी प्रतीक्षा सूची पाहता ही साप्ताहिक रेल्वे आठवड्यातून किमान तीन दिवस सोडावी, कोल्हापूर-मुंबई वंदे भारत रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. ही रेल्वे सुरू झाल्यास कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार, पर्यटन क्षेत्रास मोठी चालना मिळेल व रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रलंबित मागण्यांबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही यावेळी मंत्री दानवे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.