वनाधिकारी ग्रामस्थांत वादावादी

वनाधिकारी ग्रामस्थांत वादावादी
Published on

85006
गुळंब : वन हद्दीतील जमिनीवरून ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
...
वन जमिनीच्या मालकीवरून
ग्रामस्थ, अधिकाऱ्यांत वादावादी
गुळंब येथील प्रकार : तिलारी प्रकल्पात संपादित जमिनीचे वनविभागाकडे हस्तांतर
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ : तिलारी जलविद्युत प्रकल्पांतर्गत संपादित करण्यात आलेली जमीन वन विभागाकडे पुन्हा हस्तांतरित झाल्यानंतर ती ताब्यात घेण्यासाठी गेलेले वनविभागाचे अधिकारी व गुळंब (ता. चंदगड) ग्रामस्थ यांच्यात वादावादी झाली. ही जमीन वनविभागाची असल्याचे खात्याचे म्हणणे आहे तर अनेक वर्षांपासून ही जमीन आपण कसत असल्यामुळे आम्ही ताबा सोडणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी अॅड. संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली आज वन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी तिलारी जलविद्युत प्रकल्पासाठी पाटबंधारे खात्याने वनविभागाची ७५ हेक्टर जमीन संपादित केली होती. प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे आता ही जमीन पुन्हा वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. दरम्यान, प्रकल्प क्षेत्रातील गुळंब ग्रामस्थांनी सुमारे सात एकरांमध्ये आपला हक्क सांगितला आहे. ही जमीन अनेक वर्षांपासून आम्ही कसत आहोत. वन हक्क कायद्यानुसार ती आम्हाला मिळायला हवी, अशी त्यांची मागणी आहे.
याबाबत अॅड. मळवीकर यांनीही वन खात्यासमोर भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘पांढरपेशा लाकूड ठेकेदारांनी जंगले नष्ट केली. मात्र, जंगलात राहणाऱ्या या लोकांनीच ती वाचविण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना न्याय मिळायला हवा.’ वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे म्हणाले, ‘सद्य:स्थितीत या जमिनीत ग्रामस्थांची वहिवाट असल्याचे दिसून येत नाही. तरीही त्यांनी जमिनीवर हक्क सांगणारी संबंधित कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावीत. विनाकारण जमीन कसण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा, नियमानुसार कारवाई करावी लागेल.’ यावेळी लाडकू दळवी, लक्ष्मण दळवी, दत्तात्रय दळवी, निंगू दळवी, पांडुरंग प्रधान, पांडुरंग दळवी, सोमनाथ दळवी, बाळू गोंडे, भिवाजी पवार, नामदेव दळवी, गणपत दळवी, सुरेश दळवी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com