

इचलकरंजीत
६१ फलक हटवले
इचलकरंजी : महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुसऱ्या दिवशीही अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सुरू ठेवली. मंगळवारी छत्रपती शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी चौकापर्यंतचे साईन बोर्ड व डिजिटल फलक असे एकूण ६१ फलक हटवले. यावेळी काही फलक मालकांनी विरोध केला. मात्र, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी विरोधाला न जुमानता मोहीम सुरू ठेवली. कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांनी दिली. दोन दिवस सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात फलक जप्त केले.
-------------
सिरसंगीत आज
वारकरी मेळावा
आजरा ः सिरसंगी (ता. आजरा) येथे अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे वारकरी मेळावा होत आहे. येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर पंचक्रोशी हरिभक्तपरायण येथे उद्या (ता. २२) मेळावा होईल. सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असून ते मार्गदर्शन करणार आहेत. आजरा तालुका नवीन कार्यकारिणीचा सत्कार होणार आहे. आजरा व चंदगड तालुक्यातील वारकरी दिंडीने सहभागी होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.