

85032
पेठवडगाव ः येथे स्नेहमेळाव्यास उपस्थित शिक्षकांसमवेत विद्यार्थी.
पेठवडगावला रंगला स्मरणरंजनाचा सोहळा
सावर्डे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी २४ वर्षांनंतर रमले
सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता. २१ ः सावर्डे येथील आर. वाय. पाटील माध्यमिक विद्यालयाचे १९९९ - २००० दहावी बॅचचे विद्यार्थी २४ वर्षांनंतर एकत्र आले अन् आठवणींच्या विश्वात रमून गेले. निमित्त होते माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे. येथील जिप्सी हॉटेलमध्ये हा स्मरणरंजनाचा सोहळा रंगला.
मुख्याध्यापक एस. बी. पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भारावून गेलो आहे. आम्ही घडविलेली ही मुले आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचा आनंद आहे.’ माजी मुख्याध्यापक एस. जे. पाटील म्हणाल्या, ‘शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा आनंद देणारा अन् गुरू-शिष्याचे नाते पुन्हा दृढ करणारा आहे.’ शिवाजी पोवार, जगदीश पाटील, वंदना शिंदे, सुशीला कदम आदी शिक्षकांसह गजानन देसाई, शशिकांत जाधव, यशवंत खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील मगदूम, संजय कोठावळे, अरुण माळी, यशवंत चव्हाण, शशिकांत कुंभार, उत्तम पाटील, पांडुरंग पाटील, विश्वास चंद, उज्ज्वला उगारे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी गुरुजनांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती प्रतीमापूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक रूपाली मगदूम यांनी केले. आभार शुभांगी यादव यांनी मानले. अनिल चव्हाण, धनाजी पाटील, राहुल पाटील, सदाशिव शेळके, अनिल जंगम, सुकुमार पाटील यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.