करवीर पीठ उत्सव

करवीर पीठ उत्सव
Published on

85027
...
शंकराचार्यपीठातर्फे
आज मान्यवरांचा गौरव

पालखी प्रदक्षिणेने उद्या उत्सवाची सांगता

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : येथील शंकराचार्य करवीरपीठामध्ये सुरू असलेल्या उत्सवांतर्गत आज विद्यानृसिंह भारती यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी विविध धार्मिक विधी झाले. उद्या (बुधवारी) विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव होणार आहे.
श्रीमद जगद्‍गुरू आद्य शंकराचार्य यांचा दोन हजार ५३२ वा उत्सव शंकराचार्य मठामध्ये सुरू आहे. यानिमित्ताने आठवडाभर प्रवचन, कीर्तन, गायन, आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राघव रामदासी (पुणे), गोविंदशास्त्री जोशी (सातारा), शरद आंबेकर (हिंगोली), संदीप काजरेकर, संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे, अस्मिता देशपांडे (डोंबिवली), वाचस्पती कुलकर्णी (परभणी), श्रीवल्लभ पुजारी (नृसिंहवाडी), डी. वाय. पाटील (खेबवडे) आणि अनघा कुलकर्णी (सांगली) यांचे सत्कार होणार आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता. २३) पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com