४१ हजार विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’

४१ हजार विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’
Published on

४१ हजार विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’

कोल्हापूर विभागातील चित्र; ६६ हजार जणांना ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील एकूण ४१ हजार २५ विद्यार्थी यंदा प्रथम (फर्स्ट क्लास) श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. ६६ हजार ७१६ विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. ‘प्रथम’ श्रेणीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्येची तुलना करता कोल्हापूर विभाग राज्यात आठव्या क्रमांकांवर आहे.
यावर्षी कोल्हापूर विभागामधील एक लाख १४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख ७ हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील प्रावीण्‍या‍सह प्रथम श्रेणी आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षी पेक्षा ५०२३ इतकी वाढली आहे. द्वितीय आणि उत्तीर्ण श्रेणीमधील विद्यार्थ्यांची संख्या सात हजार ३९२ इतकी कमी झाली आहे. मात्र, यावर्षी उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता द्वितीय आणि प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ६१ टक्के आहे. निकालाच्या एकूण टक्केवारीमध्ये राज्यात आघाडीवर असलेल्या कोल्हापूरने आता प्रावीण्य, प्रथम श्रेणीमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी अधिक लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
...
यंदाचे श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
प्रावीण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्के व पुढे) ः ८५६३
प्रथम श्रेणी (६० टक्के व पुढे) ः ३२४६२
द्वितीय श्रेणी (४५ टक्के व पुढे) ः ५३०३८
उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्के व पुढे) ः १३६७८
...
गेल्यावर्षीचे श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
प्रावीण्यासह प्रथम श्रेणी ः ७२६२
प्रथम श्रेणी ः २८७४०
द्वितीय श्रेणी ः ५७२८९
उत्तीर्ण श्रेणी ः १६८१९
...

‘काही विषयांच्या प्रश्नपत्रिकांची अधिक असलेली काठिण्य पातळी, लिखाणाची सवय कमी असल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीवर झाला असल्याचे दिसून येते. मात्र, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा विद्यार्थ्यांचे गुण वाढण्यास मदत झाली आहे.
-डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य, विवेकानंद कॉलेज
...
कोल्हापूर जिल्ह्यातील विद्याशाखानिहाय विद्यार्थी
विज्ञान*२६३९७
कला*९९२४
वाणिज्य*८९८७
व्यावसायिक*१३४२
आयटीआय*४२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com