

फोटो :85073
कसबा बावड्यात अतिक्रमणविरोधी धडक कारवाई
भगवा चौक परिसरातील शेड, केबीन, हातगाड्या हटविल्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातर्फे आज कसबा बावडा येथील भगवा चौक परिसरात अतिक्रमणविरोधी धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन शेड, सात केबीन, सहा हातगाड्या हटविण्यात आल्या. अचानक झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली.
कसबा बावडा येथील भगवा चौक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक विलास साळुंखे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे यांच्यासह वीस कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. दोन शेड, सात केबीन, सहा हातगाड्या हटविण्यात आल्या. जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण हटवून डंपरमध्ये टाकून येथून नेण्यात आले. अतिक्रमणविरोधी विभागातर्फे अशाच पद्धतीने शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.