

85069 - तन्वी म्हाडगुत
85070 - आराध्य भिसे
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.३३ टक्के
बारावी परीक्षा; ‘कोकण’ सलग तेराव्या वर्षी अव्वल
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २१ ः राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे झालेल्या बारावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक ९८.३३ टक्के आहे. कोकण विभागाचा निकाल ९७.५१ टक्के आहे. सलग १३ व्या वर्षी कोकण विभाग राज्यात अव्वल ठरले. सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बोस्को हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची तन्वी म्हाडगुत (वाणिज्य- ९७ टक्के) जिल्ह्यात प्रथम आली, तर याच हायस्कूलमधील आराध्य मंदार भिसे (९५ टक्के) दुसरा आला. कणकवली कॉलेजचा परेश मडव (विज्ञान, ९४.८३ टक्के) व मालवण टोपीवाला हायस्कूलची स्नेहलता तेली (वाणिज्य ९४.८३ टक्के) हे तिसरे आले. २७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के आहे.
जिल्ह्यात मालवण टोपीवाला हायस्कूलची समृध्दी शेटये (वाणिज्य, ९४.६७) चौथी, तर कुडाळ हायस्कूलची विधी शेट्टी (वाणिज्य, ९४.५०) पाचवी आली. जिल्ह्याच्या बारावीच्या निकालामध्ये गतवर्षीपेक्षा यंदा किंचितशी वाढ आहे. गतवर्षी निकाल ९७.५१ टक्के होता. रत्नागिरीचा निकाल ५९.२२ टक्के आणि कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निकालाच्या टक्केवारीत मुली अव्वल आहेत. ती टक्केवारी ९९.०८ टक्के, तर मुलांची टक्केवारी ९७.५९ आहे.
सिंधुदुर्गात ९ हजार ७२ विद्यार्थ्यांनी आठ तालुक्यांतील २३ केंद्रांवर परीक्षा दिली. यांतील ८ हजार ९२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीच्या पुनर्परीक्षार्थींचा निकाल ८५.७१ टक्के आहे. यात जिल्ह्यात एकूण २२४ जणांनी पुनर्परीक्षा दिली. यात १९२ जण उत्तीर्ण झाले.
चौकट
निकाल मिळाला अवघ्या काही मिनिटांत
बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९९.७३, कला ९५.११, वाणिज्य ९९.३२, व्यावसायिक अभ्यासक्रम ९५.६८ आणि टेक सायन्सचा निकाल ८८.२३ टक्के आहे. विद्यार्थ्यांना २२ मेपासून ५ जूनपर्यंत गुण पडताळणीसाठी तसेच छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. आज दुपारी एकला निकाल जाहीर झाला. यंदा निकालाचे संकेतस्थळ कोलमडण्याचे प्रकार झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवघ्या काही मिनिटांत निकाल पाहता आला.
निकाल
सिंधुदुर्ग निकाल ९८.३३
विद्यार्थी नोंदणी : ९०९४
परीक्षेला बसलेले : ९०७२
एकूण उत्तीर्ण : ८९२१.
------
शाखानिहाय निकाल (टक्क्यांत)
बारावी सायन्स - ९९.७३
कला - ९३.११
कॉमर्स - ९९.३२
व्यावसायिक - ९५.६८
टेक सायन्स - ८८.६३.
-------------
तालुकानिहाय निकाल (टक्क्यांत)
दोडामार्ग -१००
वैभववाडी - १००
मालवण - ९९.२०
सावंतवाडी - ९९.००
कणकवली - ९८.१७
वेंगुर्ले - ९८.३९
कुडाळ - ९७. ६९
देवगड - ९६.९०.
----------
विभागनिहाय निकाल असा-
बोर्ड*टक्के
कोकण*९७.५१
पुणे*९४.४४
कोल्हापूर*९४.२४
अमरावती*९३.००
नाशिक*९४.७१
छत्रपती संभाजीनगर*९४.०८
लातूर*९३.३६
नागपूर*९२.१२
मुंबई*९१.१५.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.