१
Published on

85075; 85076

नरसोबाच्या नावानं चांगभलं...चा गजर
सांगवडेत श्री नृसिंह जन्मसोहळा; हजारो भाविकांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
सांगवडेवाडी, ता. २१ ः ‘नरसोबाच्या नावानं चांगभलं..''च्या जयघोषात गुलाल, भेंड-बत्तासे उधळत मावळत्या सूर्यास्ताच्या साक्षीने श्री नृसिंह जन्मकाळ सोहळा सांगवडे (ता. करवीर) येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.
पहाटे ''श्रीं''च्या मूर्तीस पूजा अभिषेक करून श्री नरसिंह अवतारातील अलंकारिक पूजा ऋषीकेश गुरव, अभिजित गुरव, दीपक रावळ, अवधूत रावळ यांनी बांधली. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. दुपारी चारला परंपरेप्रमाणे वाठारकर बुवा व सहकारी राजू सुतार महाराज, प्रकाश सुतार यांचे नरसिंह जन्मकाळाचे प्रवचन झाले. सायंकाळी ६ वा.५० मिनिटांनी जन्मसोहळा यशराज घोरपडे, आनंदनाथ महाराज सांगवडेकर व सरनोबत सरकार यांच्या उपस्थितीत झाला. नरसिंह देव देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने सुंठवडा वाटप झाले.
आकर्षक पाना-फुलांनी सजवलेल्या पालखीत ''श्रीं ''ची मूर्ती विराजमान होऊन पारंपरिक ढोलांच्या गजरात पालखी सोहळा झाला. फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीने आसमंत उजळून निघाले. नरसिंह जयंतीनिमित्त मंदिरात श्री नरसिंह देव देवस्थान ट्रस्टमार्फत भाविक पांडुरग रावळ, वैभव गुरव, वसंत जोशी सौम्य, स्वरील, स्वर्णिम सुतार, विनायक वडगावे, अभिराज ढोले, अनंत महाराज सांगवडेकर, आनंदा शिंगे यांच्या व भक्तांच्या देणगीतून पांडुरंग बाळासो रावळ, दत्तात्रय रावळ, भालचंद्र गुरव, दादू गुरव यांच्या संकल्पनेतून आकर्षक रंगीबेरंगी पाने व फुलांचा वापर करून सुंदर कलाकृतीने मंदिर सुशोभीत केले होते. मंदिर व परिसरातील पालखी मार्गावर आकर्षक विद्युतरोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. मोराच्या रूपात पालखी सजवली होती. राधेश्याम मंगल कार्यालयाचे गौरव जोशी, राजू जोशी, आनंदनाथ महाराज सांगवडेकर व राजू जोशी यांनी पारंपरिक पन्हे व कोशिंबीर प्रसादाचे वाटप केले. पालखी सोहळ्यास पोलिसपाटील रोहिणी माने, सरपंच रूपाली कुंभार, उपसरपंच कल्पना देसाई, सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत, उपसरपंच सुनिता खुडे, सांगवडे, सांगवडेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य, नरसिंह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष दादू गुरव, राजाराम गुरव, सुरेश गुरव, गुंडोपंत गुरव, भालचंद्र गुरव, बबलू गुरव, नारायण गुरव, दत्तात्रय रावळ, सचिन रावळ, अविनाश रावळ, राजेंद्र गुरव, रवींद्र गुरव, लक्ष्मण रावळ, पांडुरंग रावळ, शिवप्रसाद गुरव, अण्णा रावळ, शिवाजी गुरव व पालखी सोहळ्याचे मानकरी व भाविक उपस्थित होते.

पालखी सोहळ्यावेळी प्रथमच पाऊस
इतिहासात पहिल्यांदाच श्री नरसिंग जयंतीला पालखी सोहळा सुरू असताना सुमारे वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली. जागा मिळेल तिथे भाविकांनी आसरा घेतला.
पाऊस आल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. श्री नरसिंह देव देवस्थान ट्रस्ट मार्फत जनरेटरची सोय करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com