

फोटो 85080
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली
दहशतवादविरोधी प्रतिज्ञा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज महापालिकच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेतली.
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी एकत्र आले. यावेळी आम्ही भारताचे नागरिक आपल्या देशाच्या अहिंसा व सहिषणुतेच्या परंपरेविषयी दृढनिष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करु, अशी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नगरसचिव सुनील बिद्री, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, आस्थापना अधिक्षक राम काटकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.