निर्मिती कॉर्नर-कळंबा रोडवर नागरिकांनी डंपर अडविला

निर्मिती कॉर्नर-कळंबा रोडवर नागरिकांनी डंपर अडविला
Published on

निर्मिती कॉर्नर-
कळंबा रोडवर
डंपर अडविला

कोल्हापूर, ता.२१ : सध्या शहरात शंभर कोटींच्या निधीतून नवीन रस्ते डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल रोडवर नवीन रस्ता जोडण्याचे काम योग्य पद्धतीने होत नाही, असा आक्षेप घेत स्थानिक नागरिकांनी आज थेट डांबर घेऊन आलेला डंपरच अडविला. यावेळी महापालिका कर्मचारी व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल रोडवर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम योग्य पद्धतीने झालेले नाही, असा आक्षेप येथील स्थानिक नागरिकांचा आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्ते कामासाठी डांबर घेऊन येणारा डंपरच अडवून काम थांबविले. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. रस्त्यावर रोलर फिरविला जात नाही, तोपर्यंत डंपर सोडणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com