सीमेवर कुटूंबाची काळजी... आता सतावते पोटापाण्याची चिंता
निवृत्त सैनिकाचा मुलगा, सुनेकडून छळ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः वय ८३ वर्षे, सीमेवर देशाच्या रक्षणासाठी हयात घालवली, सीमेवरून पत्नी, मुलांच्या काळजीने बापाचे मन हेलावले. निवृत्तीनंतर सुखाचे जीवन जगायचे होते. अशातच आठ वर्षांपूर्वी पत्नीची साथ सुटली. मुलगा, सूनेकडून सुरू असलेल्या छळवादामुळे त्यांना पोलिसात धाव घ्यावी लागली.
सतत बोलणे, घरातून बाहेर काढण्याची धमकी देणे, उपाशी ठेवण्याचे प्रकार कुटूंबियांकडून सुरू झाले. याबाबत त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला. यावरून करवीर पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
घर नावावर होताच मुलाने घराबाहेर काढले, मित्राच्या घरी आसरा घेतला, पुढे आजारपण वाढत गेल्याने दवाखान्याच्या फेऱ्या वाढल्या. स्वतःचे घर, कुटूंब असतानाही रस्त्यावरचे जिवन जगण्याची वेळ आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.