भारतीय संस्कृती टिकवण्याची गरज

भारतीय संस्कृती टिकवण्याची गरज

भारतीय संस्कृती टिकविण्याची गरज
धना पाटील : सिरसंगी येथे वारकरी मेळावा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ : सामाजिक कार्यातून पुण्य मिळविण्यासाठी सेवाभावी असावे. अहंकार आणि गर्वाने प्रगती होत नाही. भ्रष्टाचारामुळे देश व समाजाचे नुकसान होत आहे. निकोप समाजासाठी भारतीय संस्कृती टिकविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष धना पाटील यांनी केले.
सिरसंगी (ता. आजरा) येथील वारकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वारकरी मंडळाची तालुका कार्यकारिणी जाहीर केली. संपत देसाई यांनी वारकरी चळवळ ही जातीभेदाच्या पलीकडे समतेचा पुरस्कार करणारी असून, ही चळवळ पुढे नेण्याकरिता आजरा तालुका वारकरी भवन उभारणीसाठी जागेच्‍या मागणीचे निवेदन दिले आहे. त्यासाठी आम्ही वारकरी मंडळासोबत असल्याचे मत व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात खाडे, राजाराम जाधव, सिरसंगीचे सरपंच संदीप चौगले, कारखाना संचालक सुभाष देसाई, बाळासाहेब सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष संतू कांबळे, गंगाराम येडगे, नामदेव सुतार, जानबा धडाम, कल्पना जाधव, पांडुरंग जोशिलकर, लक्ष्मण शिंत्रे, आदी उपस्थित होते. सी. आर. देसाई यांनी स्वागत केले. वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष गौरव सुतार यांनी प्रास्ताविक केले. संजय घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. बाबूराव आडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com