आर.सी.सी. कॉलमची ताकद ओळखणाऱ्या उपकरणाला पेटंट

आर.सी.सी. कॉलमची ताकद ओळखणाऱ्या उपकरणाला पेटंट

85455
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी
महाविद्यालयाला २६ वे पेटंट
कॉलमच्या मजबुती ओळखण्यासाठी उपयुक्त
कोल्हापूर, ता. २३ : आरसीसी कॉलमची मजबुती ओळखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपकरणासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला पेटंट मंजूर झाले आहे. महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रा. संतोष आळवेकर यांनी हे उपकरण संशोधित केले असून महाविद्यालयाला मिळालेले हे २६ वे पेटंट आहे.
कोणत्याही इमारतीच्या बांधकामामध्ये आरसीसी कॉलम महत्त्वपूर्ण असतात. या कॉलमवरच इमारतीचा सर्व भार पेलला जातो, त्यामुळे त्याची मजबुती महत्वाची असते. प्रा. संतोष आळवेकर यांनी बनवलेल्या या उपकरणामध्ये आरसीसी कॉलमची ताकद, एकजिनसीपणा ओळखण्यासाठी सेन्सरचा उपयोग केला आहे. या कॉलममधील असणाऱ्या मटेरियलचे गुणधर्म, कॉलमवर पडलेल्या वजनाचा भार विभाजित करण्याची ताकद व त्याचे बांधकामविषयक गुणधर्माचा अभ्यास उपकरणाद्वारे करता येणार आहे. संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्‍वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे व अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com