एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजचा ९७.३५ टक्के निकाल

एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेजचा ९७.३५ टक्के निकाल

85489
तन्वी दळवी
85495
रेहान शेख
85496
सई नावले
85497
श्रावणी खाडे
85498
केदार पाटील

‘एस. एम. लोहिया’चा
९७.३५ टक्के निकाल
कोल्हापूर : येथील एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७.३५ टक्के लागला. कॉलेजच्या ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के असून, वाणिज्यचा ९५.३८, कला विभागाचा निकाल ७७.७७ टक्के, तर व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाचा निकाल ८७.८० टक्के लागला आहे. विज्ञान विभागातील तन्वी विजय दळवी हिने ९१.६७ टक्के गुण मिळवत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिने गणितात १०० पैकी १०० गुण मिळविले. रेहान समीर शेख याने ८६.५० टक्क्यांसह द्वितीय, तर सई सर्जेराव नावले हिने ८५.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. अन्य विद्या शाखानिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अनुक्रमे क्रमांक असे, वाणिज्य : श्रावणी खाडे (८३), ओंकार पोवार (८१.३३) आणि आरती येडगे (७५.६६). कला : केदार पाटील (८८.३३), छाया खोंदल (७०.१७), खुशबू यादव (६५.१७). व्यावसायिक अभ्यासक्रम : लक्ष्मी गोरल (७४.१७), प्रियांका लंबे (७३.३३), राहुल वडर (७२.१७).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com