लेखक परिचय

लेखक परिचय

पंडित विनोद डिग्रजकर
* शास्त्रीय संगीताच्या घराण्यात जन्म
* वडील पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे संगीताचे शिक्षण
* सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी. ई. सिव्हिल पदवी प्राप्त
* सुधाकर डेव्हलपर्स कंपनीतर्फे ३५० फ्लॅटची निर्मिती, प्रत्येक इमारतीला शास्त्रीय संगीतातील रागाचे नाव
* १९७७ मध्ये अखिल भारतीय पातळीवरील आकाशवाणी संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक
* सांगली आकाशवाणीवरून ३० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय व सुगम संगीताचे सादरीकरण
* शास्त्रीय व सुगम या दोन्ही प्रकारांत आकाशवाणीची ‘अ’ श्रेणी, आकाशवाणीच्या राष्ट्रीय प्रसारणामधून कार्यक्रमांचे सादरीकरण
* भारतासह विदेशात मैफली
* श्री महालक्ष्मी सहकारी बॅंकेचे तीन वेळा अध्यक्षपद, वीस वर्षांहून अधिक काळ संचालक
* कोल्हापूर महापालिकेकडून कोल्हापूर भूषण पुरस्काराने सन्मानित
--------------
पंडित संजीव अभ्यंकर
* हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अत्यंत प्रतिभाशाली गायक म्हणून प्रसिद्ध
* असामान्य प्रतिभेच्या जोरावर व तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या साधनेचे फळ म्हणून शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त
* भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रमुख सभा-समारंभात गायन
* परदेशात अमेरिका, कॅनडा, ॲास्ट्रेलिया, युरोप, सेशल्स व मध्यपूर्व देशांतही कार्यक्रम
* मिळालेल्या प्रचंड रसिकमान्यतेचे फळ म्हणून आजपर्यंत जगभरातील दोनशेहून अधिक निरनिराळ्या शहरांत कार्यक्रम
* लहान वयापासूनच अनेक मान-सन्मान, यामध्ये प्रामुख्याने मध्यप्रदेश सरकारचा पं. कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्कार, ‘गॅाडमदर’ या चित्रपटातील पार्श्वगायनासाठीचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार, आकाशवाणीतर्फे राष्ट्रपती पदक आणि टॉप ग्रेड, पं. जसराज गौरव पुरस्कार, गानसरस्वती किशोरी आमोणकर पुरस्कार, फाय फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘सूररत्न’ या उपाधी यांचा समावेश
---
श्रुती सडोलीकर-काटकर
* जयपूर अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम गायिका
* वडील आणि गुरू पंडित वामनराव सडोलीकर यांच्याकडून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची तालीम
* मुंबई विद्यापीठाच्या भाषा विषयाच्या पदवीधर, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत विशारद
* मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी विद्यापीठातून संगीत विषयात पदव्युत्तर पदवी, विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवात ‘लक्षणीय माजी विद्यार्थिनी’ म्हणून गौरव
* प्रतिष्ठेच्या विविध फेलोशिप, षण्मुखानंद संगीत सभेचा ‘संगीत शिरोमणी’ पुरस्कार, ‘आयकॉन्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार, ‘स्वरयोगिनी प्रभा अत्रे पुरस्कार’, ‘गुरुगंधर्व’ गुरुराव देशपांडे राष्ट्रीय पुरस्कार यांसह असे अनेक मानाचे पुरस्कार
* जगभरातल्या संगीत महोत्सवांमध्ये गायनासाठी सन्मानपूर्वक आमंत्रणे
* पॅरिसमधील ‘गिफ्टेड विमेन ऑफ द वर्ल्ड’ या सी.डी.साठी संपूर्ण जगातून निवडलेल्या ९ विशेष गायिकांमध्ये श्रुतीजींच्या आवाजाची निवड
* मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापिका
* २००९ ते २०२० या काळात लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थेत कुलपतीपद
* २०२३ मध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना ‘पहिला करवीर तारा पुरस्कार’ प्रदान
-----
डॉ. धनंजय दैठणकर
* शैक्षणिकदृष्ट्या आयुर्वेदिक पदवीधर असून, पूर्ण वेळ व्यावसायिक संतूरवादक आहेत
* लहानपणी तबला वादनाचे जवळजवळ १० वर्षे शिक्षण
* पं. रतनलाल टिक्कू यांच्याकडे सुरवातीचे संतूरवादनाचे शिक्षण सुरू केल्यावर पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांना पुढील संतूरवादनाच्या शिक्षणासाठी बोलावून घेतले
* ‘केंद्रीय शिष्यवृत्ती’, ‘सूरमणी’, ‘पुणे की आशा’, गानवर्धनचा ‘स्वरयोगिनी प्रभा अत्रे’ पुरस्कार प्राप्त
* देशातील अनेक मान्यवर संगीत संमेलनात सोलो संतूरवादन
* विदेशात संतूरवादनासाठी अमेरिका, कॅनडा, युरोप, सिंगापूर, गल्फ अशा अनेक देशांचे दौरे
* गुरूबरोबरही एकत्र संतूरवादनाची संधी
* संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम, शिष्यवर्गही मोठा
------
पतंजली मादुस्कर
* निवृत्त केंद्र निदेशक, आकाशवाणी
* मूळचे विदर्भातील अमरावतीचे. अमरावती व नागपूर येथे शिक्षण
* अमरावतीला पं. दे. के. काळे, पं. दिनकरराव उपाख्य, भैय्यासाहेब देशपांडे, पं. मनोहर कासलीकर व पं. श्यामसुंदर खर्डेनविस, तर नागपूर येथे पं. प्रभाकरराव खर्डेनविस, पं. राजाभाऊ कोकजे, श्रीमती निर्मला केळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण
* काही काळ वनस्थली विद्यापीठात संगीत विषयाचे अध्यापनाचे कार्य केल्यावर आकाशवाणीत कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू, तिथे विविध पदांवर कार्य करण्याचा अनुभव
* आकाशवाणीत असताना ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याचे गायक पं. गजाननबुवा जोशी, जयपूर घराण्याचे गायक निवृत्तीबुवा सरनाईक, ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर घराण्याचे गायक पं. डी. व्ही. काणे बुवा यांचा सहवास
* निवृत्तीनंतर आजही संगीताचे अध्यापन कार्य सुरू
--------
पंडित डॉ. अरुण द्रविड
* वयाच्या ११ व्या वर्षांपासून संगीत शिक्षण सुरू
* अल्लादियाखाँसाहेब यांचे शिष्यत्व लाभलेले उस्ताद मजीद खाँसाहेब आणि गानतपस्विनी कै. मोगुबाई कुर्डीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर या तीन दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन
* जयपूर अत्रौली घराण्याचे प्रमुख गायक म्हणून ते आज ओळखले जातात
* आजवर दीडशेहून अधिक मैफली
* आज अनेक प्रथितयश शिष्यांना मार्गदर्शन
* जयपूर घराण्याला दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल अनेक पुरस्कार
* आयआयआयटीमधून सुवर्णपदक आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट असा शैक्षणिक प्रवास
-------
डॉ. विनोद विश्वनाथ ठाकूरदेसाई
* सहायक प्राध्यापक (शा. संगीत), प्र. विभागप्रमुख संगीत व नाट्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
* सुरवातीला अनंत घाडी व तुकाराम घाडी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण
* त्यानंतर नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे, डॉ. भारती वैशंपायन, पं. अरुण कुलकर्णी यांच्याकडे, तर सध्या पं. विनोद डिग्रजकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण
* बी.ए. (अर्थशास्त्र-इंग्रजी), एम.ए.पीएच.डी. (संगीत), संगीत अलंकार, आकाशवाणीचे बी.हाय.आर्टिस्ट
* श्रीम. सुशीलाबाई गानु पुरस्कार- गांधर्व मंडळ, मुंबई-राजर्षी छत्रपती शाहू महाराज अचिव्हमेंट ॲवॉर्ड- पीपल्स आर्टस्, मुंबई तसेच नारद या भूमिकेसाठी उत्कृष्ट सहायक अभिनय व गायन पुरस्कार
*संगीत सौभद्र, स्वयंवर, संशयकल्लोळ, जयदेव आदी नाटकांत भूमिका. रत्नागिरी, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, पुणे आदी ठिकाणी तसेच आकाशवाणी सांगलीवरून शास्त्रीय संगीत सादर
----
डॉ. पौर्णिमा धुमाळे
* आग्रा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका
* संगीताचा वारसा घरातून प्राप्त
* मातोश्री, किराणा घराण्याच्या गायिका डॉ. सुलभा ठाकर यांच्याकडून आरंभीचे शिक्षण
* आग्रा घराण्याचे दिग्गज गुरू पं. बबनराव हळदणकर यांच्याकडून प्रदीर्घ तालीम
* सध्या विद्वान गायक पं. विवेक जोशी यांच्याकडून आग्रा-ग्वाल्हेर गायकीची तालीम
* युजीसीकडून फेलोशिप प्राप्त, अनवट रागांच्या अभ्यासासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून शिष्यवृत्ती
* आकाशवाणीच्या ए ग्रेड कलाकार
* देशातील अनेक प्रतिष्ठित मंचांवरून गायन सादर
* एसएनडीटी विद्यापीठ, पुणे येथे संगीत विषयाच्या प्राध्यापिका
* संगीत विषयातील राष्ट्रीय परिसंवाद व विविध विद्यापीठांत आयोजित कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन
-------
सौ. मधुवंती प्रफुल्ल देव
*बी.एस.सी., एम.ए. संगीत (एस.एन.डी.टी. विद्यापीठ)

* सांगीतिक शिक्षण ः पं. जुक्कलकर, पं. गंगाधर पिंपळखरे, पं. राजाभाऊ देव, विदुषी श्रीमती अलका देव-मारुलकर, पं. मधुसूदन (आप्पा) कानेटकर, पद्मविभूषण गानसरस्वती श्रीमती किशोरी आमोणकर
*विदुषी श्रीमती कुमुदिनी काटदरे व पं. अरुणजी कुलकर्णी यांच्याकडेही शिक्षण सुरू

*सांगीतिक कारकीर्द
- एस. एन. डी. टी. विद्यापीठाकडून ‘गानहिरा’ पारितोषिक
- गेली ३० वर्षे शास्त्रीय व सुगम संगीतात आकाशवाणीच्या कलाकार
- ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे बी.ए. व एम. ए. (संगीत) साठी मान्यताप्राप्त गुरू
--------------------------
डॉ. केशव चैतन्य कुंटे
* डॉ. केशव चैतन्य कुंटे (म्हणजेच चैतन्य कुंटे) हे हार्मोनिअम वादक, बंदिशकार संगीत रचनाकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व गुरू असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व
* अष्टपैलू कलाकार, ‘संगीत अलंकार’ (अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळ) असून, इतिहास, भारतविद्या व पुरातत्त्वशास्त्र या विषयात एम. ए. व एम. फिल.
* ‘प्रार्थनास्थळांतील संगीत - एक संगीत-संस्कृतीशास्त्रीय अभ्यास’ या विषयावरील संशोधनासाठी त्यांना संगीत विषयातील डॉक्टरेट
* ‘टप्पा गायकी’ या विषयावरील संशोधनासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या पाठ्यवृत्तीचे मानकरी
* एक बंदिशकार म्हणून प्रचलित व अप्रचलित रागतालांत अनेक गानप्रकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा सुमारे चारशे बंदिशींची रचना. पैकी तीनशे बंदिशी ‘राग चैतन्य’ या ग्रंथाच्या दोन खंडांत (२०२०) प्रकाशित
* ‘भारतीय धर्मसंगीत’ हा त्यांचा या विषयावरचा अभ्यासपूर्ण ग्रंथ मराठीतील पहिलाच ग्रंथ
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्’च्या संगीत विभागात गुरू व सहायक प्राध्यापक
* महाराष्ट्र कल्चरल सेंटर संचालित ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज’ या पुण्यातील एकमेव संगीत संग्रह-अभ्यास केंद्राचे ते संस्थापक संचालक
---------
हेमंत पेंडसे
* पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्य परिवारातील ज्येष्ठ शिष्य
* भुसावळ येथे कै. वसंतराव बापट यांच्याकडे सुरुवातीला तबल्याचे शिक्षण व नंतर कै. मनोहर बेटावदकर यांच्याकडे गायनाचे प्राथमिक शिक्षण
* हेमंत पेंडसे यांना १९७८ पासून १९९८ पर्यंत वीस वर्षांचा प्रदीर्घ काळ पं. जितेंद्र अभिषेकी यांचा सहवास. यात पहिली बारा वर्षे गुरुगृही म्हणजे गुरुकुल पद्धतीने शिक्षण
* पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव येथे दोन वेळा, तर अनेक महोत्सवांमध्ये स्वतंत्र हजेरी
* पं. जसराज गौरव पुरस्काराने सन्मान, आकाशवाणी उच्च श्रेणीचे संगीतकार
* कै. पं. बबनराव हळदणकर व डॉ. विकास कशाळकर यांच्याकडून काही काळ मार्गदर्शन
* कृष्णांजली, संस्कार यात्रा, लय विठ्ठल सूर विठ्ठल अशा कार्यक्रमांची निर्मिती
* शास्त्रीय संगीतामधील लहान मुलांसाठी अनेक सरगम गीतं, तराणे तसेच शास्त्रीय संगीत, भक्ती व भावसंगीतात अनेक रचना संगीतबद्ध. त्यांचे अनेक प्रसिद्ध कलाकारांकडून गायन
* संगीतकार म्हणून अनेक अल्बमला संगीत
......................
पंडित सुहास व्यास
* लहान वयात संगीत मूल्ये आणि प्रशिक्षण आत्मसात करण्यास सुरुवात
* वडील पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचे मार्गदर्शन
* ग्वाल्हेर, आग्रा आणि किराणा या तीन वेगवेगळ्या घराण्यांच्या पारंपरिक अनुशासनाशी संबंधित असले तरी स्वतःची एक शैली
* कलाकार म्हणून उल्लेखनीय कामगिरी
* भारतातील तसेच परदेशातील प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये सादरीकरण
* संगीत नाटकाचे दिग्दर्शन
* प्राचीन परंपरेचे मशाल वाहक तसेच भारतीय शास्त्रीय संगीताची नवजागरण चळवळ पुढे नेणारे म्हणून ओळख
* मैफलीत जन्मजात सौंदर्य आणि शांततेने चिन्हांकित, रचनांच्या पद्धतशीर सादरीकरणासाठी प्रख्यात
* ऑल इंडिया रेडिओमध्ये श्रेणीबद्ध कलाकार, अनेक सीडी आणि कॅसेट टेप्स प्रकाशित
* अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि भारतात आणि परदेशात व्याख्यानांचे प्रात्यक्षिक
----
पं. सत्यशील देशपांडे
* गायक, संगीततज्ज्ञ, रचनाकार, लेखक
* हिंदुस्तानी संगीत परंपरेचे गाढे अभ्यासक, सृजनशील गायक, रचनाकार व लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
* १९७२ मध्ये कै. पं. कुमार गंधर्व यांच्या घरी देवास येथे सलग तीन वर्षे तालीम
* अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध गायक व अभ्यासकांचे गाणे सांगीतिक विचारासह ध्वनिमुद्रित करून जतन करण्याचा उपक्रम फोर्ड फौंडेशनच्या सहाय्याने सुरू
* मुंबईत त्यांनी स्थापित केलेल्या ‘संवाद फाउंडेशन संस्थेत कार्य सुरू, सुमारे पाच हजार तासांपेक्षा जास्त संकलित ध्वनिमुद्रण व अनेक बजुर्ग गायकांकडून गोळा केलेल्या बंदिशींच्या अप्रकाशित अशा नोटेशन्सचा मोठा संग्रह असे या आर्काइव्जचे स्वरूप
* देश-विदेशात अनेक मैफिली गाजविल्या
* ‘लेकिन’ या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्याबरोबर गायिलेल्या युगुलगीतासाठी सर्वोत्तम पार्श्वगायकाचा पुरस्कार
* ‘कहन’ या पारंपरिक तसेच स्वरचित बंदिशींच्या ध्वनिमुद्रित संग्रहाचे भारतरत्न लतादीदींच्या हस्ते लोकार्पण
* २०२२ मध्ये ‘गान गुणगान’ हे पुस्तक प्रकाशित. दोन महिन्यांत दुसरी आवृत्ती, पुस्तकास आपटे वाचनालय (इचलकरंजी) पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार
वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार २०१८, लतादीदी पुरस्कार २०२३ अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी
-------
पंडित डॉ. राम देशपांडे
* शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील अग्रगण्य नाव, उत्तम कलाकार, उत्तम गुरू, विद्वान व अभ्यासू संगीततज्ज्ञ
* पं. प्रभाकर देशकर, नागपूर, पं. यशवंतबुवा जोशी, पं. उल्हास कशाळकर, पं. बबनराव हळदणकर, पं. यशवंत महाले अशा अनेक दिग्गज गुरूंकडून त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या तीनही घराण्यांची गायकी आत्मसात व स्वतंत्र शैली प्रस्थापित
* ‘मिश्र राग’ या विषयावर प्रबंध सादर करून गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टरेट ही पदवी ५ सुवर्णपदकांसह प्राप्त, डॉक्टरेटसाठी पंडित वि. रा. आठवले यांचे मार्गदर्शन
* संपूर्ण भारतभर तसेच अमेरिका, इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, दुबई, मस्कत, अबुधाबी, केनिया आदी देशांत संगीत मैफली
* बिर्ला कलाकिरण पुरस्कार, विद्यासागर पुरस्कार, संगीत रिसर्च ॲकॅडमी कलकत्त्याचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार
* गंधार म्युझिक ॲकॅडमीच्या माध्यमातून शिष्यांना मार्गदर्शन
* ‘गानयोगी’ या लघुपटाला संगीत, ‘वंदे मातरम्‌’ हे राष्ट्रगीत २४ रागांच्या रागमालेमध्ये संगीतबद्ध
* शारदा संगीत विद्यालय, बांद्रा येथे ‘संगीत साधना’ शीर्षकांतर्गत संगीताच्या कार्यशाळा- संगीत शिक्षणाचे व प्रचाराचे कार्य सुरू
-----
सौ. मंजिरी आलेगांवकर
* वडील पं. मोहन कर्वे हे गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे यांचे शिष्य आणि उत्तम गायक कलाकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच संगीताचे, गायकीचे संस्कार
* शालेय शिक्षण सुरू असताना कै. पं. नवनीतभाई पटेल यांच्याकडेही गायन शिकण्याचा योग
* सुप्रसिद्ध लेखक, गायक आणि संगीत-समीक्षक कै. वामनराव देशपांडे यांची खास जयपूर घराण्याची अनेक वर्षे तालीम, कै. अप्पा कानेटकर आणि पं. हळदणकर यांचेही मार्गदर्शन
* शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम संगीत, नाट्यसंगीत, उर्दू गझल, ठुमरी, निर्गुणी भजन, इ. संगीत प्रकारांचाही अभ्यास
* अनेक सांगीतिक विषयांवर व्याख्याने
* दिवाळी अंक, आकाशवाणीसाठी सांगीतिक विषयावर लेखन
* सुधीर फडके यांच्या ‘सुलश्री’ प्रतिष्ठानची आणि संगीत रिसर्च अॅकॅडमी कलकत्ता यांची प्रथम क्रमांकाची शास्त्रीय संगीतासाठीची शिष्यवृत्ती
* भारतभर आणि भारताबाहेरही अनेक महत्त्वाच्या व्यासपीठावर मैफली
* आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या टॉप ग्रेड आर्टिस्ट
* भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देऊन सन्मान. यांसह अनेक मानाचे व प्रतिष्‍ठेचे पुरस्कार
* शास्त्रीय, उप-शास्त्रीय संगीताच्या, अभंगांच्या अनेक सीडीज् उपलब्ध
----
डॉ. विकास कशाळकर
* शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील प्रयोगशील कलाकार म्हणून सुपरिचित
* अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची संगीताचार्य पदवी संपादन
* ‘Creativity In Music’ या विषयावर प्रबंध
* आकाशवाणीचे टॉप ग्रेड कलाकार
* पं. गजाननराव जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची गुरूकुल पद्धतीने तालीम
* आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम सादर
* ‘बालचित्रवाणी’त निर्माता पदावर कार्यरत होते
* सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठामध्ये भीमसेन जोशी अध्यासनामध्ये चीफ प्रोफेसर म्हणून कार्य
* त्या काळात संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारित ‘ऊस डोंगापरी’ या संगीत नाटकाचे लेखन व संगीत दिग्दर्शन
* संपूर्ण देशात व परदेशात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम
* भारती विद्यापीठ, पुणे व ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथे रिसर्च गाईड. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली Ph.D. पदवी प्राप्त
* ‘मालनिया गुंद लावो’ हे पं. गजाननराव जोशी व पं. अनंतमनोहर यांच्या बंदिशीचे पुस्तक संपादित, तर ‘ओंकार आदिनाद’ हे स्वरचित बंदिशींचे पुस्तक प्रकाशित
* पं. विष्णू दिगंबर पलुसकरांच्या जीवनावरील एकपात्री नाटक २०१४ मध्ये रंगमंचावर सादर
* ‘संगीतातील घराणी’ यावर विपुल लेखन
-----
डॉ. शुभांगी आरुण बहुलीकर
*बी.ए. (जर्मन, इंग्लिश), एम.ए. (इंग्लिश), एम.ए. (संगीत), बी.एड. (संगीत, मराठी), विद्यावाचस्पती (PH.D. संगीत- संगीतातील सौंदर्यशास्त्र)
*गुरू- पं. छोटा गंधर्व, पं. विजय बक्षी, कै. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे
* ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातून प्राध्यापक आणि विभागप्रमुख (संगीत / नृत्य/नाटक) म्हणून निवृत्त
* ‘बंदिशीतील सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकास महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
* आंतरराष्ट्रीय ‘Musicology Classical Music’ पुस्तकात लेख प्रसिद्ध, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संगीतविषयक पेपर प्रसिद्ध
* भारतीय शास्त्र विचार आणि संगीत रत्नाकर ही दोन पाठ्यपुस्तके बी. ए. संगीत विषयासाठी सर रतन टाटा ट्रस्टतर्फे प्रसिद्ध
* सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील गेल्या साठ वर्षांतील पहिली संगीत विषयातील पीएच.डी.
* भारत व परदेशात संगीताचे अनेक कार्यक्रम
* गानवर्धनतर्फे कै. पं. जानोरीकर, कै. डॉ. सुहासिनी कोरटकर पुरस्कार, ‘संगीत भूषण’ पुरस्कार, अॅमस्टरडॅम विद्यापीठातर्फे आणि संगीत रिसर्च अकादमी, कलकत्तातर्फे डॉ. प्रेमलता शर्मा यांच्या नावे “Youngest Promising Music Researcher In India’’ या पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार व सन्मान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com