‘शिवराज’ मध्ये ११-१२ वी कला, बी.ए. इंग्रजी माध्यम प्रवेश सुरू

‘शिवराज’ मध्ये ११-१२ वी कला, बी.ए. इंग्रजी माध्यम प्रवेश सुरू

‘शिवराज’मध्ये ११-१२ वी कला,
बी. ए. इंग्रजी माध्यम प्रवेश सुरू
गडहिंग्लज, ता. २९ ः येथील शिवराज विद्या संकुलामध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून अकरावी व बारावी (आर्टस्‌) तसेच बी. ए. भाग एक, दोन व तीन हे पदवी शिक्षण इंग्रजी माध्यमातून सुरू केले आहेत. चंदगड, आजरा, गडहिंग्लज व सीमाभागात हा अभ्यासक्रम पहिल्यांदाच सुरू होत असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘हा विभाग राष्ट्रपती पदक विजेते प्राचार्य ए. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे स्पोकन इंग्लिशचे मोफत शिक्षण मिळणार आहे. शिवराजमध्ये विद्यार्थी व पालकांची वाढती मागणी लक्षात घेऊन नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार विद्यार्थी हिताचा विचार करत हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. आजच्या काळाची गरज ओळखून संस्थेने हे नवे पाऊल टाकले आहे. शिवराजच्या ज्ञान परंपरेत नव्या युगाची नांदी व्हावी आणि शिवराजीयन नव्या जगाचा वेध घेण्यास सक्षम व्हावा, यासाठी ही विधायकता संस्थेने जपली आहे. यासाठी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी या नव्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी डॉ. महेश चौगुले व प्रा. विक्रम शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com