दीपाली यमकर

दीपाली यमकर

86605
दीपाली यमकर
------------------

दीपालीने धनगरवाड्यावर
ज्ञानाचा दीप केला तेजोमय

चंदगड, ता. २९ ः काजिर्णे धनगरवाड्यावर राहणारी दीपाली देहू यमकर हिने दहावीच्या परीक्षेत ८५.३० टक्के गुण मिळवून धनगरवाड्यावर ज्ञानाचा दीप तेजोमय केला. ती येथील दि न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी आहे. धनगरवाडा ते चंदगड सुमारे पाच किलो मीटरचे अंतर. आठवी ते दहावी अशी तीन वर्षे तिने ज्ञानार्जनासाठी दररोज १० किलोमीटरची पायपीट केली. तिचे हे कष्ट अखेर यशदायी ठरले. शेळी-मेंढी पालन आणि जंगलावर अवलंबून असणाऱ्या यमकर कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
दीपालीची कौटुंबिक स्थिती अत्यंत हलाखीची. आई-वडील शेळी- मेंढी पालन करतात. लाकूड, मध, गवत, रानमेवा विकून कौटुंबिक खर्च चालवला जातो. अशा स्थितीत त्यांनी मुलीला शिकवण्याचा निर्धार केला. आपले शिक्षण अर्धवट राहिले, परंतु मुलीला ती म्हणेल तेवढे शिकवायचे असा निश्चय वडिलांनी केला होता. शिवाय मुलीच्या ज्ञानावर आणि कष्टावर त्यांचा ठाम विश्वास होता. ती ज्या धनगरवाड्यावर राहते, तो जंगलाने वेढलेला. हत्ती, गवे, रानडुक्कर, बिबट्या, अस्वल, साप यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर. कच्चे रस्ते. पावसाळ्यात तर ओढ्याला पूर आला की वाट बंद. या सर्व अडचणींवर मात करीत तिने शिक्षणाच्या ओढीने पायपीट केली. शाळेतील वेळेव्यतिरीक्त मिळणारा वेळ अभ्यासासाठी दिला. मुख्याध्यापक एन. डी. देवळे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी तिला शैक्षणिक खर्चासाठी हातभार लावला. प्रोत्साहन दिले. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन अधिकारी बनण्याचे तीचे स्वप्न आहे.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com