गड- हरळीत घरफोडी

गड- हरळीत घरफोडी

86667
हरळी खुर्द ः गडहिंग्लज-महागाव रोडवरील बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी तिजोरीत ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

...
हरळीत ११ तोळे दागिन्यांवर डल्ला
भरदिवसा घरफोडी; बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरी
सकाळ वृत्तसेवा
महागाव, ता. २९ : हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील रवींद्र भीमराव हाळे यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी दिवसा घरफोडी केली. यामध्ये चोरट्यांनी ११ तोळे सोने चोरले. बंद घराचा कडीकोयंडा उचकटून ही चोरी केली आहे. त्यामुळे हरळी परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मंगळवारी (ता. २८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. याबाबतची माहिती अशी- रवींद्र हाळे हे आपल्या कुटुंबासह हरळी येथील गडहिंग्लज-महागाव रस्त्यावर असलेल्या वैरागवाडी फाटा येथे राहतात. ते गडहिंग्लज साखर कारखान्याचे कामगार आहेत. मंगळवारी सकाळी आठला ते नेहमीप्रमाणे कारखान्यात कामाला गेले. दरम्यान, शेतात पेरणीची लगबग असल्याने पत्नी साधना हाळे या घराला कुलूप लावून दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतीकामासाठी गेल्या होत्या. त्या घरी परत आल्यानंतर दरवाजाचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसले. आत जाऊन पाहिल्यानंतर चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी दागिने ठेवलेल्या तिजोरीची पाहणी केली असता तिजोरी फोडलेली दिसली. त्यात ठेवलेले संपूर्ण ११ तोळे सोन्याचे दागिने नसल्याचे दिसून आले. रवींद्र हाळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांत दोन गंठण, मणी-मंगळसूत्र व टॉप्सचा समावेश आहे. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी किमती ऐवजावर डल्ला मारला आहे. दरम्यान, पोलिसांत ५० हजार रुपये जुन्या दराने सोन्याची किंमत पाच लाख ६५ हजार इतकी नोंदवली असली तरी सध्याच्या बाजारभावानुसार पावणे आठ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.
...
* मुम्मेवाडी-इंचनाळ-हरळी कनेक्शन
मंगळवारी (ता. २८) सकाळी मुम्मेवाडी येथे बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. त्यानंतर इंचनाळला दुपारी बारा ते एकच्या दरम्यान निवृत्त सैनिक दळवी बंधूंच्या घरातून १९ तोळे सोने चोरले. त्यानंतर सायंकाळी हरळी येथे बंद घराला टार्गेट करूनच चोरीची घटना घडली. दरम्यान, गिजवणे येथे चोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. या तिन्ही घटना चोरट्यांच्या एकाच टोळीकडून घडल्या असाव्यात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com