गड- वसतीगृह प्रवेश

गड- वसतीगृह प्रवेश

डॉ. आंबेडकर मुलांच्या
वसतिगृहात प्रवेश सुरू
गडहिंग्लज ः येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आठवीपासून पुढे विद्यालयीन, कनिष्ठ महाविद्यालयीन, बिगर व्यावसायिक महाविद्यालयीन व व्यावसायिक महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांना अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह ते वसतिगृहात जमा करावेत. जेवण, राहण्याची सोय, गणवेश, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, जीम, निर्वाहभत्ता, सहल, स्टेशनरी भत्ता आदी सुविधा विनामूल्य असतील. प्रवेशासाठी शेंद्री रोडवरील आयटीआयजवळच्या वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक प्रियंका पाटील-दुंडगेकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com