नगराध्यक्षांकडून कामाला गती

नगराध्यक्षांकडून कामाला गती

ई-टॉयलेट कामाला
चंदगडमध्ये गती

नगरसेवक हळदणकर यांचा विरोध कायम

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २ ः येथील महसूल भवननजीक ई-टॉयलेटच्या कामाला नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी विरोध केल्याने काम थांबले होते. त्यावर नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांनी प्रत्यक्ष उभे राहून या कामाला गती दिली. कामात अडथळा आणल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे निवेदनही नगरपंचायतीच्या वतीने पोलिसांना दिले. दरम्यान हळदणकर यांनी आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले.
शहरासाठी तीन ठिकाणी ई-टॉयलेट मंजूर झाल्या. त्यानुसार बाबा गार्डन, भाजी मंडई आणि महसूल भवनजवळ त्यांची उभारणी करण्याचे नियोजन केले. कामाला सुरुवातही झाली. मात्र, आपल्या प्रभागात नागरी वस्ती असून त्या ठिकाणी स्वच्छतागृह नको अशी भूमिका घेऊन हळदणकर यांनी काम थांबवले. ही कामे कोणत्या ठिकाणी करायची हे सभागृहात न ठरवताच तसेच माझा प्रभाग असताना मला कोणतीही सूचना न देता मनमानी पद्धतीने कामकाज केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान नगराध्यक्षा काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक अभिजित गुरबे, झाकीर नाईक, नेत्रदीपा कांबळे, संजय चंदगडकर, राजू कडूकर, दिलीप चंदगडकर, अमित जाधव यांनी हा विषय राजकारणाचा नसून विकासकामांचा आहे. त्यामुळे काम थांबवून चालणार नाही, अशी भूमिका घेऊन प्रत्यक्ष उभे राहून कामाला गती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com