गडहिंग्लजची पाणी योजना 
निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करू

गडहिंग्लजची पाणी योजना निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करू

गडहिंग्लजची पाणी योजना
निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करू
ठेकेदाराची ग्वाही; महामार्गाऐवजी पर्यायी रस्त्याने अंतर्गत जलवाहिनी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले आहे. अठरा महिन्यांच्या निर्धारित कालावधीपूर्वी हे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही ठेकेदार निखिल जोशी यांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात दुरुस्तीवेळी अडचण उद्‌भवू नये म्हणून महामार्गाऐवजी पर्यायी रस्त्याने जलवाहिनी टाकली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी गायकवाड यांनी पाणी योजनेचा आढावा घेतला. पाणी योजनेसाठी जनरेटा सुरू आहे. दोन आठवड्यापासून योजनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे. कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईप्स तयार केल्या जाणाऱ्या ठिकाणी जाऊन त्यांचा दर्जा तपासला आहे. तो चांगला आहे. पाणी योजनेबाबत नागरिकांच्या अनेक शंका आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
जोशी म्हणाले, ‘‘काही तांत्रिक अडचणीमुळे काम सुरू करण्यास थोडा विलंब झाला. पण, आता कामाला सुरुवात झाली आहे. चारपैकी दोन पाण्याच्या टाकींचे काम सुरू केले आहे. बाजार समिती आणि वडरगे मार्गावर हे काम सुरू आहे. पावसापूर्वी त्याचे फाउंडेशन पूर्ण होईल. अंतर्गत जलवाहिनी टाकताना लोकांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. काम पूर्ण करण्याचा कालावधी जून २०२५ पर्यंतचा आहे. पण, त्यापूर्वीच काम पूर्ण केले जाईल.
गडहिंग्लज शहरातून महामार्गाचे काम नुकतेच झाले आहे. त्यापूर्वी जलवाहिन्या टाकाव्यात असा एक मतप्रवाह होता. पण, एकदा महामार्ग झाला की त्याची खुदाई करता येत नाही. भविष्यात जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम निघाले तर अडचण होणार होती. त्यामुळे पर्यायी रस्त्याची निवड केली आहे. बी. बी. पाटील कॉलनीतून जलवाहिनी टाकली जाईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com