पेट्रोल चोरताना सापडल्याने सराईताला चोपले

पेट्रोल चोरताना सापडल्याने सराईताला चोपले

पेट्रोल चोरल्याच्या संशयावरून हाणामारी
दौलतनगरातील प्रकार; पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांत जुंपली
ःसकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः मोटारसायकलमधील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून सराईत गुन्हेगार अजय अनिल पाथरूट (वय २५, रा. सायबर चौक) याला पकडण्यात आले. यानंतर भागातील सत्यम्‌ तरुण मंडळासमोर हाणामारीचा प्रकार घडला. अजय पाथरूट याला झालेल्या हाणामारीप्रकरणी नीलेश सुनील कांबळे (वय २६, रा. दौलतनगर) याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघेही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.
फिर्यादी सुनील कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अजय पाथरूट हा कांबळे यांच्या दारात पार्क केलेल्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढताना मिळून आला. याप्रकरणी पाथरूटविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रात्री साडेअकराच्या सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात धरून नीलेश कांबळे हा सत्यम्‌ तरुण मंडळाजवळ आला. येथे बसलेल्या अजय पाथरूटला तिथे का आलास, अशी विचारणा करीत मारहाण सुरू केली. कांबळेसोबत असणाऱ्या अन्य साथीदारांनीही पाथरूटला बेदम मारहाण केली. यात तो जखमी झाला.
मारहाणीबाबत अजय पाथरूटने दिलेल्या फिर्यादीवरून, नीलेश सुनील कांबळे (वय २७), गुंड्या ऊर्फ रोहन राजू माने (२२), अभिषेक सागर निकम (२२, तिघे रा. दौलतनगर), ऋषिकेश पुजारी, डी. अंक्या ऊर्फ अनिकेत विठ्ठल धोत्रे, शेखर (सर्व रा. तीन बत्ती चौक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्री उशिरा नीलेश कांबळे, रोहन माने, अनिकेत धोत्रे या तिघांना ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com