अकरावी केंद्रीय प्रवेशाला 
गडहिंग्लजमध्ये मुदतवाढ

अकरावी केंद्रीय प्रवेशाला गडहिंग्लजमध्ये मुदतवाढ

अकरावी केंद्रीय प्रवेशाला
गडहिंग्लजमध्ये मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीच्या अर्ज स्वीकृतीचा आज शेवटचा दिवस होता. आजपर्यंत १०९१ विद्यार्थ्यांचे अर्ज जमा झाले आहेत. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेला बुधवारपर्यंत (ता. ५) मुदतवाढ देण्यात आली आहे.
शहरातील आठ कनिष्ठ महाविद्यालयांत विज्ञान शाखेच्या सहा अनुदानित, तर १३ विनाअनुदानित तुकड्या आहेत. त्यांची एकूण प्रवेश क्षमता १५०० इतकी आहे. २८ मे पासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. येथील एम. आर. हायस्कूलवर अर्ज विक्री व स्वीकृतीची ऑफलाईन पद्धतीने प्रक्रिया सुरू आहे. आज यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या अर्ज स्वीकृतीचा शेवटचा दिवस होता. गेल्या पाच दिवसांत १२३७ अर्जांची विक्री झाली, तर १०९१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज जमा केले आहेत.
दरम्यान, दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे; पण गुणपत्रकाची मूळ प्रत अद्याप मिळालेली नाही. ३ जूनला मूळ प्रत मिळणार आहे. त्यामुळे प्रवेशाची मुदत बुधवारपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे पत्रक प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव आर. आर. कोरवी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com