नरेंद्र विद्यापीठातर्फे पुरस्कार वितरण

नरेंद्र विद्यापीठातर्फे पुरस्कार वितरण

फोटो : 87248
कोल्हापूर : नरेंद्र विद्यापीठ संस्थेमार्फत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरविंद देशपांडे आणि अन्य मान्यवर.

कवीने कायम लिहित राहिले पाहिजे
डॉ. राजेंद्र लोखंडे : नरेंद्र विद्यापीठातर्फे पुरस्कारांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : कवी हा संवेदनशील मनाचा असतो. त्याने कायम लिहित राहिले पाहिजे, असे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले. नरेंद्र विद्यापीठातर्फे वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रम करवीर नगर वाचनालयाच्या वाडीकर सभागृहात झाला. या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात न. ना. देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार गितेश शिंदे (ठाणे), बबन सराडकर (अमरावती), मंदार ओक (चिपळूण), अनिता देशमुख (पुणे), प्रा. प्र. द. कुलकर्णी (नाशिक), वनिता जांगळे (पेठ), स्नेहा घाटे (बंगळूर) यांना देण्यात आला. वा. गो. कुलकर्णी-चिक्कोडीकर उपक्रमशील शिक्षक, जानकी जोशी-खडकलाटकर सेवागौरव पुरस्कार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक न. वा. जोशी-खडकलाटकर सेवा गौरव, दमयंती नरेंद्र देशपांडे-राशिवडेकर गृहिणी गौरव आदी पुरस्कारांचे या वेळी वितरण झाले.
प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, गिरिजा गोडे, मनीषा शेणई, गणेश गावकर यांना कृतज्ञतापत्र प्रदान केले. ‘पाऊस’ या काव्य लेखन स्पर्धेसह निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली. सुनील करगुपीकर, विणा कुलकर्णी, कुमार तोडकर, अंजली कुलकर्णी, प्रा. अर्चा देशपांडे, राजेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अरविंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. पी. एन. देशपांडे यांनी परिचय करून दिला. मिलिंद देशपांडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com