अकरावी प्रवेश

अकरावी प्रवेश

सहाव्या दिवशी
७१६ विद्यार्थ्यांची नोंदणी
अकरावी प्रवेश : सहा दिवसांत तीन हजारांवर ऑनलाईन अर्ज

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी शाखेच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्यात येत आहे. सहाव्या दिवशी आज एकूण ७१६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. दरम्यान, सहा दिवसांत एकूण तीन हजार १४० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून गेल्या वर्षांपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून कला, वाणिज्य मराठी विद्याशाखेला वगळले. त्यामध्ये केवळ विज्ञान, वाणिज्य इंग्रजी विद्याशाखा ठेवली. कला, वाणिज्य मराठीची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांच्या पातळीवर राबविण्याची कार्यवाही केली. त्यानुसार यंदाही ही प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयांनी या दोन्ही शाखांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
...
कलाशिक्षण अभ्यासक्रम
राज्यातील सर्व कलाशिक्षण महाविद्यालयातील फाउंडेशन म्हणजेच मूलभूत अभ्यासक्रमासाठीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच कला महाविद्यालयांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी https://doaonline.co.in/FA2024/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन महाविद्यालयांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com