पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरणात समाधी हटविल्याने पडसाद

पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरणात समाधी हटविल्याने पडसाद

स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी समाधी हटविली
स्थानिकांत संताप; काम बंद पाडले, गुन्हा दाखल करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचे काम महापालिकेकडून सध्या सुरु आहे. या परिसरात राजघराण्यातील समाधी आहेत. यातील एक समाधी आज हटविण्यात आली. त्याचे पडसाद उमटले. परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत काम बंद पाडले. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महापालिकेकडून पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचे काम ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहे. विस्तारीकरण करत असलेल्या परिसरात राजघराण्यातील मान्यवरांच्या तीन समाधी आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी काल, शुक्रवारी ठेकेदाराची भेट घेऊन समाधी हटवून विस्तारीकरणाचे काम करु नये, अशी सुचना दिली होती. परंतु आज यातील एक समाधी हटवून यातील दगड बांधकामासाठी वापरल्याचे निदर्शनास आले. यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत हे कामच बंद पाडले. यावेळी महापालिकेने किंवा ठेकेदाराने समाधी पाडण्याची परवानगी राजघराण्याकडून घेतली आहे का? अशी विचारणा नागरिकांनी केली. जर परवानगी घेतली नसेल, तर संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी (ता.३) महापालिकेत जाऊन नागरिकांकडून महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांना याचा जाब विचारला जाणार आहे.
------------
कोट
ही जागा राजघराण्याची असून या जागेतील समाधी हटविण्यासाठी त्यांनी राजघराण्याची परवानगी घेतली आहे का? याचे उत्तर द्यावे. याबाबत सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन जाब विचारला जाणार आहे. योग्य उत्तर न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
- सुशील भांदीगरे, निमंत्रक, जुना बुधवार पेठ अन्याय निवारण समिती
----------
पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरणाची काम सुरू आहे. हे काम करताना या ठिकाणी असणाऱ्या समाधी तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या तात्पुरत्या स्वरूपात येथून हलविण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यापूर्ववत त्या ठिकाणी पुन्हा बसविण्यात येणार आहेत.
-नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com