आता माजी सैनिकांच्या विधवा, पाल्यांनाही नोकरीची संधी

आता माजी सैनिकांच्या विधवा, पाल्यांनाही नोकरीची संधी

माजी सैनिकांच्या विधवा, पाल्यांनाही नोकरीची संधी
शासन निर्णयात केली सुधारणाः वीरपत्नी, दिव्यांग सैनिकांनाही मिळणार लाभ
प्रवीण देसाई : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : देशाच्या सीमेवर आपल्या छातीचा कोट करून शत्रूशी झुंजणाऱ्या सैनिकांना निवृत्तीनंतर शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज संस्था, महामंडळे या ठिकाणी नोकरीची संधी आहे. आता ही संधी माजी सैनिकांच्या विधवा, मुले, शहीद जवानांच्या विधवा, मुले यांच्याबरोबर दिव्यांग सैनिकांनाही मिळणार आहे. सैनिकांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘मेस्को’ महामंडळाच्या माध्यमातून नोकरीचा लाभ मिळणार आहे. सरकारने हे पाऊल उचलले असून, यासाठी पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
भारतीय सैन्यामधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेस्को’ महामंडळाची सुरुवात करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत माजी सैनिकांना नोकरीची संधी देण्यात आली आहे. यामध्ये शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये कारकून, सुरक्षारक्षक, वाहनचालक, वायरलेस ऑपरेटर आदी पदांचा समावेश आहे. आतापर्यंत फक्त माजी सैनिकांनाच नोकरीचा लाभ मिळत होता. माजी सैनिक किंवा शहीद जवानांच्या अवलंबितांना ही सुविधा उपलब्ध नव्हती. याबाबत झालेल्या मागणीनुसार सरकारने पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करत माजी सैनिकांबरोबरच माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या विधवा, मुले, दिव्यांग सैनिकांचाही यामध्ये समावेश केला. नुकताच सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
...
‘मेस्को’कडून मिळतेय नोकरीची संधी
माजी सैनिकांना नोकरीची संधी मिळावी, यासाठी ‘मेस्को’ महामंडळ स्थापन झाले असून, ते सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून माजी सैनिकांकडून नोकरीसंदर्भात नोंदणी करून घेतली जाते. यानंतर नोकरीची संधी उपलब्ध झाल्यावर संबंधित माजी सैनिकांना कळविले जाते. नोकरीबाबत महामंडळ व शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये करार होतो. नोकरी लागल्यानंतर पगारासह पी. एफ., पेन्शन, ईएसआय, आरोग्य विमा अशा सुविधा महामंडळाकडून संबंधित नोकरदाराला दिल्या जातात.
...
‘मेस्को महामंडळाच्या माध्यमातून यापूर्वी फक्त माजी सैनिकांनाच नोकरीची संधी होती; परंतु आता सुधारित शासन निर्णयामुळे माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या विधवा व मुलांना नोकरीचा लाभ होणार आहे. याबाबत मेस्कोच्या संचालक मंडळाची बैठक होऊन या नवीन निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होईल. त्यानंतर त्यांच्याकडून जसे निर्देश येतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
- नामदेव पाटील, सैनिक कल्याण संघटक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com