‘श्रमिक’ने मुळे गरीबांना पत

‘श्रमिक’ने मुळे गरीबांना पत

ajr23.jpg.....
87405
आजरा : येथील श्रमिक पतसंस्थेचे उद्‍घाटन करताना डॉ. भारत पाटणकर. या वेळी मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, अंजनताई रेडेकर, संपत देसाई, अशोक तर्डेकर, संजय घाटगे आदी.
------------------------
‘श्रमिक’ मुळे गरिबांना पत
डॉ. भारत पाटणकर : आजऱ्यात पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २ ः जगाच्या बाजारात ज्यांना पत नव्हती त्यांना पत निर्माण करून देण्याचे काम येथील श्रमिक पतसंस्थेने केलेले आहे. संस्थेची पंचवीस वर्षातील वाटचाल कौतुकास्पद आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही जपण्याचे काम संस्थेने केले आहे, असे गौरवोद्‍गार श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी काढले.
येथील जिजामाता कॉलनीमध्ये श्रमिक पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्‍घाटन डॉ. पाटणकर यांच्याहस्ते झाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जनता बॅंक आजराचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, आजरा कारखान्याचे संचालक अशोक तर्डेकर, संजय तर्डेकर प्रमुख उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष संपत देसाई यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. श्री. शिंपी म्हणाले, ‘या तालुक्यातील धरणग्रस्तांनी व श्रमिक लोकांनी एकत्रित येत संस्थेची स्थापना केली. संस्थेची वाटचाल कौतुकास्पद आहे. जिल्ह्यामध्ये आजऱ्याचा सहकारात आदर्श आहे. या संस्थेचाही यामध्ये सहभाग होतो.’ श्रीमती रेडेकर म्हणाल्या, ‘कोणतीही आर्थिक संस्था चालवणे हे आव्हान आहे. अशा काळात श्रमिक पतसंस्थेने उत्कृष्टपणे वाटचाल केलेली आहे.’ अशोक तर्डेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी उपसभापती भारती कांबळे, उपाध्यक्ष विष्णू मांजरेकर, संचालक मारुती चव्हाण, प्रकाश कालेकर, नारायण सुतार, मसणू कांबळे, बाबूराव येडगे, मनीषा गुरव, शारदा पाटील, शांताराम पाटील आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष संजय घाटगे यांनी स्वागत केले. राजाराम पोतनीस यांनी आभार मानले.
----------------
संतांची परंपरा पायदळीत तुडवण्याचा प्रयत्न
पंढरपुरात सध्या सुरू असलेला प्रकार हा अंधश्रद्धा पसरवण्यासारखा आहे. बहुजनांचे दैवत असलेल्या विठ्ठलाबाबत प्रश्नचिन्ह तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. या आठशे वर्षांत ज्ञानेश्वरापासून तुकोबापर्यंत त्यानंतर अनेक संतांनी विठ्ठलाचे वर्णन अभंगातून केले आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनीयासह अन्य अभंग आहेत. पण त्या संत परंपरेला पायदळीत तुडवण्याचे काम केले जात आहे. याबाबत अनेक संशोधकांनी संशोधनही केले आहे. लवकरच याबाबत पंढरपुरात पत्रकार परिषद घेणार असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com