कोल्हापूरच्या मुलींच्या संघाची मुंबईवर मात

कोल्हापूरच्या मुलींच्या संघाची मुंबईवर मात

Published on

लोगो ः आंतरजिल्हा कनिष्ठ गट मुलींच्या फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूरच्या मुलींच्या संघाची
मुंबई संघावर मात

आदिती ढेरेचा एकमेव विजयी गोल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २ ः पालघर येथे सुरू असलेल्या आंतरजिल्हा कनिष्ठ गट मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. मुलींच्या संघाने मुंबई संघाचा एक विरुद्ध शून्य गोलने पराभव केला.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर संघाचा आज तुल्यबळ मुंबई संघाशी सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच कोल्हापूरच्या जान्हवी ढेरे, सिद्धी सूर्यवंशी, समीक्षा मेंगाणे, सुमेधा देसाई, आदिती ढेरे, पूर्वा भोसले, वैभवी कानडे यांनी वेगवान चढाया केल्या. सामन्याच्या चाळीसाव्या मिनिटास आदिती ढेरेने मिळालेल्या संधीवर मैदानी गोलची नोंद केली. त्यामुळे पूर्वार्धातच कोल्हापूर संघ एक विरुद्ध शून्य गोलने आघाडीवर राहिला. पूर्वार्धात मुंबई संघाने आक्रमक चढाया केल्या. पण कोल्हापूरची गोलरक्षक आसावरी पाटील हिने उत्कृष्ट गोलरक्षण करीत मुंबई संघाच्या चढाया परतावून लावल्या. अखेरीस याच गोलसंख्येवर कोल्हापूर संघाने सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com