उद्या ठरणार कोल्हापूरचे खासदार

उद्या ठरणार कोल्हापूरचे खासदार

(फोटो - ८७३७०)
कोल्हापूर ः लोकसभा निवडणुकीच्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रमणमळा येथील महसूल भवन येथे तयारी पूर्ण झाली.

जिल्ह्याचे खासदार उद्या ठरणार
मतमोजणीची तयारी पूर्ण, दुपारपर्यंत निकाल शक्य

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः लोकसभेच्या बहुचर्चित कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचे निकाल मंगळवारी (ता.४) स्पष्ट होणार आहेत. त्यासाठी मतदान मोजणी केंद्रे सज्ज असून, सुरक्षा यंत्रणाही तैनात आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण २८ टेबलवर मतमोजणी होईल. टपाली मतदानाची स्वतंत्र मोजणी होणार आहे. सकाळी आठला ही प्रक्रिया सुरू होणार असून, तीनपर्यंत दोन्ही मतदारसंघांचा निकाल स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात दुरंगी लढत आहे. हातकणंगले मतदारसंघात सत्यजित पाटील (सरुडकर), राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मंगळवारी (ता.४) दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी अनुक्रमे रमणमळा येथील धान्य गोदाम आणि राजाराम तलाव येथील जलसंपदा गोदाम येथे होणार आहे. यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली पूर्ण केली आहे. सकाळी दहापर्यंत टपाली मतदानाचे निकाल हाती येतील. त्यानंतर विधानसभानिहाय फेऱ्यांना सुरुवात होईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मोजणीसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था आहे. तेथे चौदा टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, शिपाई आणि सूक्ष्म निरीक्षक असेल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या आणि मतदानयंत्रातील मते यांची मोजणी केली जाणार आहे. संध्याकाळी सातपर्यंत अंतिम निकाल हाती येईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर निवडून येणाऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

६८६ कर्मचारी नियुक्त
दोन्ही मतदारसंघांसाठी मिळून ६८६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बाराशेहून अधिक पोलिस सुरक्षा यंत्रणेत असणार आहेत. दहा टक्के कर्मचारी राखीव आहेत.

विधानसभानिहाय मतमोजणी फेऱ्या
कोल्हापूर
चंदगड - २८
राधानगरी - ३१
कागल - २६
कोल्हापूर दक्षिण - २४
करवीर - २६
कोल्हापूर उत्तर - २३
--------------------------
हातकणंगले
शाहूवाडी - २४
हातकणंगले - २४
इचलकरंजी - १९
शिरोळ - २१
इस्लामपूर - २१
शिराळा - २४
-----------------------
कोल्हापूर मतदारसंघ
एकूण मतदार - १९ लाख ३६ हजार ४०३
झालेले मतदान - १३ लाख ८६ हजार २३०
टक्के - ७१.५९
------------------------
हातकणंगले मतदारसंघ
एकूण मतदार - १८ लाख १४ हजार २७७
झालेले मतदान - १२ लाख ९० हजार ७३
टक्के - ७१.११
------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com