प्रतिक्रीया विधी व न्याय

प्रतिक्रीया विधी व न्याय

विधी व न्याय
.......
खंडपीठासाठी सरकारवर दबाव आणावा
.............
87977
नवीन खासदारांनी मुंबईचे सर्किट बेंच-परिक्रमा खंडपीठासाठी केंद्रीय पातळीवरून प्रयत्न करावेत. देशात दहा व्हर्च्युअल सर्किट बेंच करण्याचा मानस सर्वोच्च न्यायालयाचा आहे. पैकी पहिले राजस्थान येथील बिकानेर येथे सुरू झाले आहे. दुसरे कोल्हापुरात करता येईल यासाठी प्रयत्न व्हावेत. कोल्हापुरातील महसूलमधील बहुतांशी खटले पुण्यात विभागीय आयुक्तांकडे चालतात. यामुळे पक्षकारांना हेलपाटे मारावे लागतात. कोल्हापुरातच अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक झाल्यास हे हेलपाटे कमी होतील.
ॲड. सर्जेराव खोत
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन
-------
54013
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लागणारी कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी खासदारांनी प्रयत्न केले पाहिजेत. इन्फास्ट्रक्चरसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठपुरावा करून मूर्तस्वरूप द्यावे. संविधान टिकण्यासाठी आणि त्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत. याचसोबत आयआयटीसारख्या संस्था कोल्‍हापुरात आण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
विवेकानंद घाटगे
सदस्य, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल
-----------------
87972
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती तयार करावी. पाठपुराव्यातून त्याला यश मिळवावे. याचसोबत मोठ्या प्रमाणात उद्योग-व्यवसाय कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या उद्योगांना संरक्षण द्यावे, त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत. यातून बेरोजगारी कमी होईल. तरुणांच्या हाताला काम मिळेल. यासाठी पुण्यासह इतर ठिकाणाहून बाहेर जाणाऱ्या कंपन्यांना कोल्हापुरात आणावे.
तानाजी नलवडे, निवृत्त न्यायमुर्ती, मुंबई, उच्च न्यायालय
--------------
87992
कोल्हापूरच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाकडून विशेष प्रकल्प आणले पाहिजेत. यामध्ये विमानतळाचा विस्तार होण्यासाठी अनेक शहरांशी, राज्यांशी कनेक्टिव्ही वाढविली पाहिजे. रेल्वेच्या विविध सेवा, मेट्रो, लोकलसारख्या सुविधा इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी मिळाल्या पाहिजेत. मोठे उद्योग कोल्हापुरात आणले पाहिजेत. आयटी पार्क केवळ चर्चेत आहे, त्यासाठी दिल्लीतून प्रयत्न व्हावेत. याचसोबत मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात झाले पाहिजे. यासाठी राजकीय दबाव गट निर्माण केला पाहिजे.
ॲड. बी. आर. पाटील, कोल्हापूर
---------------
87973
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी खासदारांनी राजकीय मूठ बांधली पाहिजे. कोल्हापुरातील इन्फास्ट्रक्चर उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रस्ते विकासासाठी केंद्रीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात निधी आणावा. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना पार्किंग, भक्त निवासासाठी दिल्लीतून भरीव निधीची व्यवस्था करावी. विमान आणि रेल्वेच्या माध्यमातून शहरांची कनेक्टिव्हीटी वाढवावी, जादा उड्डाणे, गाड्यांची व्यवस्था करावी.
ॲड. महावीर कराडे, कोल्हापूर
------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com