शिवभक्त म्हणून हातात हात घालून काम करावे

शिवभक्त म्हणून हातात हात घालून काम करावे

87663
...
शिवभक्त म्हणून हातात हात घालून काम करावे
संयोगिताराजे छत्रपती : समिती सदस्य-प्रशासन अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : ‘किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनात अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती पदाधिकारी व रायगड जिल्हा प्रशासनाने ‘शिवभक्त’ म्हणून हातात हात घालून काम करावे,’ असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले. रायगडावरील हत्तीखाना येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनासाठी आज समिती व जिल्हा प्रशासनाच्या आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
संयोगिताराजे म्हणाल्या, ‘युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शेकडो मावळे घेऊन सुरू केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा लोकोत्सव झाला आहे. लाखोंच्या संख्येने शिवभक्त या दिवशी रायगडावर येतात. हा सोहळा जगभरातील लोकांपर्यंत पोहोचला आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी प्रशासनाने सज्ज राहिले पाहिजे. समितीचे पदाधिकारी किंवा प्रशासनातील अधिकारी शिवभक्त म्हणून गडावर सेवा देत आहेत. यंदाही शिवभक्त म्हणून काम करण्याची आवश्‍यकता आहे. त्यात ते तसूभरही कमी पडणार नाहीत.’ यावेळी त्यांनी वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, गर्दी, नियंत्रण, पार्किंग, पाणीपुरवठा, समाज माध्यम, शौचालये, वीजपुरवठा, अग्निशमन पथक, आदी विषयांवर सखोल चर्चा केली.
या बैठकीस रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, एम. आर. नमदे, सत्यजित बडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता शंकर काळे, आर. जे. पाटील, संजीवनी कट्टी, दीपक घोडे, मनीषा घोडे, फत्तेसिंह सावंत, संदीप खांडेकर, हेमंत साळोखे, सत्यजित भोसले, चैत्राली कारेकर, विनायक फाळके, प्रवीण पोवार, विश्‍वास निंबाळकर, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com