‘सायबर’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

‘सायबर’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

फोटो 87690

सायबर महाविद्यालयाच्या
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
कोल्हापूर, ता.३ : सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामधून २००९ ते २०११ या बॅच मधून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा झाला. महाराष्ट्र व कर्नाटकमधून सुमारे ३५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित. होते. याप्रसंगी उपस्थितांचा झाडाचे रोप व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सायबर महाविद्यालयाचे माजी विभागप्रमुख डॉ. दीपक भोसले म्हणाले, ‘ंमहाविद्यालयामधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विकासात माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाप्रती व समाजाप्रती सामाजिक दायित्व जोपासणे गरजेचे आहे. बी. एन. पाटील व डॉ. प्रकाश रणदिवे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विजयसिंह पाटील, अमित खांडेकर, संदीप जंगम, मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे, सनी माने, इमरान मणेर, सर्जेराव मिसाळ, अमर कुंभार, प्रसाद साळुंखे, सागर कदम, रूपाली काळे, प्रकाश काटकर, विक्रम काळेबेरे, सुप्रिया शिंदे, धनश्री पाटील, वैशाली कदम, आदी उपस्थित होते. रणजीत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कविता मिरजे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com