टाकाळा पाणी गळती

टाकाळा पाणी गळती

फोटो 88163

तीन महिन्यांपासून
टाकाळा चौकात पाणी गळती

बांधकामाच्या काँक्रिटीकरणामुळे दुरुस्ती कठीण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः टाकाळा चौक येथे तीन महिन्यांपासून मोठी पाणी गळती सुरू आहे. एका इमारतीच्या बांधकामाचे काँक्रिटीकरण त्या गळतीवर केले असल्याने दुरुस्ती कठीण बनली आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे.
चौकात एक नवीन अपार्टमेंट बांधले जात आहे. त्याच्या एका बाजूला बांधकाम केले जात असताना पाण्याचे कनेक्शन बंद केले नाही. तशाच अवस्थेत तेथील काँक्रीटही केले गेले आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जाते. त्याची तक्रार केल्यानंतरही काहीच कार्यवाही झालेली नाही. तेथील पाणी बांधकामासाठी वापरले गेले असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. एकीकडे तेथीलच काही भागात अपुरे पाणी येताना, हजारो लिटर पाणी गटारातून वाहून जात असल्याचा विरोधाभास दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर नागरिक वैतागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com