पोलिसवृत्त

पोलिसवृत्त

बांधकाम साहित्य चोरीस
कोल्हापूर : प्रतिभानगरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावरून साहित्य चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला. दोन संशयित महिलांनी मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास रिक्षातून येऊन लोखंडी जॅक, चॅनेल, स्लॅबच्या प्लेट, लोखंडी गज, पाईप असे ३० हजारांचे साहित्य चोरून नेले. याबाबत राहुल दिंडे (वय ३३, रा. जुना बुधवार पेठ) यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
...
पुशिरे फाट्यावर
तरुणास मारहाण
कोल्हापूर : कामावरून परतणाऱ्या अभिषेक कृष्णात पाटील (वय २५, रा. माजनाळ, पन्हाळा) याला पुशिरे फाट्यावर अडवून मारहाण करण्यात आली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. जखमीवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.
...
शिवाजी पेठेत
तरुणास मारहाण
कोल्हापूर : किरकोळ वादातून सागर कमलाकर पाटील (वय ३२) याला मारहाण करण्यात आली. मंगळवारी रात्री शिवाजी पेठेतील झुंजार क्लब परिसरात हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
विषारी द्रव्‍य
प्यायल्याने एकाचा मृत्यू
कोल्हापूर : विषारी द्रव्‍य प्यायल्याने प्रकृती चिंताजनक बनलेले उत्तम सदाशिव शेलार (वय ५४, रा. वडणगे) यांचा मृत्यू झाला. सोमवारी त्यांनी शेतात विषारी द्रव्‍य प्‍यायल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
...
शेतीच्या वादातून
मायलेकास मारहाण
कोल्हापूर : शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे शेतीच्या वादातून मायलेकास मारहाण करण्यात आली. सुरेश तुकाराम पाटील (वय ३२), कमल तुकाराम पाटील अशी जखमींची नावे आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम शिवाजी पाटील, सुहास संभाजी पाटील, धोंडिराम भिवा पाटील आणि शिवाजी धोंडिराम पाटील (चौघे, रा. शिरोली दुमाला) यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
...
हॉर्न वाजविल्याच्या
कारणातून हाणामारी
कोल्हापूर : दुचाकीचा हॉर्न वाजविल्याच्या रागातून विचारेमाळ परिसरात हाणामारीचा प्रकार घडला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या प्रकारात रेहान शहाबुद्दीन शेख, सुमित संतोष नाईकनवरे, जय अजय तेरदाळकर आणि तेजस संदीप नाईकनवरे (सर्व, रा. पटवेगार गल्ली, विचारेमाळ) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत शाहूपुरी पोलिसांत दाखल फिर्यादीवरून हल्लेखोर सुनील ऊर्फ बबलू, जाफर बेपारी, वीर आणि रॉकी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

...
...
दारू पिण्यास
पाणी न दिल्याने मारहाण
पांजरपोळ परिसरातील प्रकार : तिघांवर गुन्हा

कोल्हापूर : पांजरपोळ परिसरात दारू पिण्यास बसलेल्यांना पाणी न दिल्याच्या रागातून कल्लाप्पा कल्लोळी कुऱ्हाडे (वय ४५, रा. १४ वी गल्ली, राजारामपुरी) यांना मारहाण करण्यात आली. काचेची बाटली डोक्यात फोडल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी राजकुमार वसीम मलिक (वय २८) व त्याचे सख्खे भाऊ विपुल आणि मिलन (तिघे, रा. उजळाईवाडी) या तिघांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबतची अधिक माहिती अशी, उजळाईवाडी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकुमार मलिक आणि त्याचे दोन भाऊ सोमवारी सायंकाळी पांजरपोळ येथे दारू पिण्यासाठी बसले होते. त्यातील एकाने शेजारील कारखान्यात जाऊन पाणी मागितले. तेथील कर्मचारी कुऱ्हाडे यांनी पाणी भरले नसल्याचे सांगितल्याने मलिक याला राग आला. त्याने कुऱ्हाडे यांच्या डोक्यात बीअरची बाटली फोडून त्यांना मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आसपासचे कारखानदार, कर्मचारी घटनास्थळी धावत आल्याने तिघांनी पळ काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com