अवनी निवेदन

अवनी निवेदन

88155
कोल्हापूर ः प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देताना अवनि संस्थाचे पदाधिकारी व महिला प्रतिनिधी. (नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)


कचरा वेचकांना
सुविधा द्याव्यात
प्रदूषण नियंत्रण महामंडळाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः बर्मन समितीच्या शिफारशीनुसार कचरा वेचक महिलांना हॅण्ड ग्लोज, बुट, मास्क व इतर सुविधा देण्यात याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन अवनि संस्था यांच्यातर्फे प्रदूषण नियंत्रण महामंडळाला देण्यात आले. वरिष्ठ लिपिक उमेश शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.
अवनि संस्थेत गेली दहा वर्षे जिल्ह्यात कचरा वेचक महिलांचे संघटन केले आहे. कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी अवनि संस्था प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून कचरावेचक कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण दिले जाते. तसेच आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. जिल्ह्यातील २५ टक्के कचरा अवनि संस्थांचे कचरावेचक महिला संकलित करतात त्यांचे महिला पर्यावरण रक्षणाला हातभार लावतात. प्रत्येक घरातून दिला जाणारा कचरा हा वर्गीकरण करून दिला जात नसल्याने डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यांचे डोंगर तयार होताना दिसत आहेत. २०१६ ला घनकचरा व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला. त्यानुसार कचरा वर्गीकरण करण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची आहे त्यानुसार ओला व सुका कचरा स्वतंत्र करावा ओल्या कचऱ्यापासून खत करणे अपेक्षित आहे. याच कायद्याच्या आधारे जिल्ह्यातील कचरा वेचकांचा सर्व्हे करून कचरा वेचण्याच्या कामात समाविष्ट करणे बंधनकारक आहे, मात्र तसे घडलेले नाही. यातून कचरा वेचक कामगाराच्या जगण्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पर्यायवरण दिनाचे औचित्य साधून कचरा वेचकांना विविध सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी कचरावेचकांनी अवनि संस्थेच्या माध्यमातून केली आहे. अवनि संस्थेचे जैनुद्दीन पन्हाळकर, संगीता लाखे, राजश्री नाईक, बनाबाई कांबळे, मंगल कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
--------------
मागण्या अशा
- घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करा
- जिल्ह्यातील कचरावेचक कामगारांना ओळखपत्र द्या
- कचरा वर्गीकरणाचे काम द्यावे ते कचरा वेचकांना समाविष्ट करून घ्यावे
- वॉर्डानुसार कचरा संकलन केंद्र सुरू करा
- अवनि संस्थेतर्फे कचरा वेचकांचे बचत गट तयार करा
- कचरा वेचकांच्या बचत गटाला, गल्ली, गावनिहाय, कचरा वेचण्याचे काम द्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com