अंबाबाई मंदिर विकासकामे

अंबाबाई मंदिर विकासकामे

88222
...
नगारखान्याचे काम पावसाळ्यातही सुरू राहणार
अंबाबाई मंदिरात विविध विकासकामे ः गरूड मंडपाचे लाकडी खांब तयार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील नगारखान्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. पावसाळ्यातही हे काम सुरू राहावे, यासाठी देवस्थान समितीकडून संरक्षक पत्रे मारण्यात येत आहेत. या आठवड्यात संरक्षक पत्रे मारून झाल्यानंतर नगारखान्याचा तिसरा मजला उतरविण्यात येणार आहे. नगारखान्याचे पुरातन स्वरूप कायम ठेवून त्याला नवी झळाळी दिली जाणार आहे. दरम्यान, गरूड मंडपासाठी लागणारे लाकूड चंद्रपूर येथून नागपुरात आणले असून, त्याचे मोठे खांब तयार झाले आहेत. टेंबलाई टेकडी येथे मंडप उभारणी झाल्यानंतर हे खांब कोल्हापुरात आणले जाणार आहेत.
अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप पूर्णतः उतरवून तो नव्याने साकारला जाणार आहे. मणिकर्णिका कुंडाचे मूळ स्वरूप आणून त्याचे जतन-संवर्धन केले जाणार आहे. तसेच पुरातन नगारखान्याची दुरुस्ती होऊन तो नव्या दिमाखात सज्ज होणार आहे. या सगळ्या सुधारणांसाठी देवस्थान समितीला २२ कोटींचा निधी खर्च करण्याची मान्यता मिळाली आहे. त्यानंतर विविध विकासकामांना देवस्थान समितीने प्रारंभ केला आहे.

गरुड मंडपासाठी चंद्रपूर येथील लाकूड मागविण्यात आले असून त्यापासून लाकडी खांब नागपुरात बनविले गेले आहेत. पावसापासून बचाव होण्यासाठी टेंबलाई टेकडी येथे मंडप उभारल्यानंतर या लाकडाचे नक्षीकाम पूर्वीच्या स्वरूपाप्रमाणे केले जाणार आहे. हे स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर मंदिर आवारातील गरुड मंडप उतरवण्यास सुरुवात होईल. हे सर्व काम अतिशय नाजूक व हेरिटेज असल्याने त्याला वेळ लागेल. पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात मंदिरात याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. मणिकर्णिका कुंडासाठीचे दगड टेंबलाई टेकडी आवारात दाखल झाले आहेत. नगारखान्याचे कामदेखील सुरू होत आहे. एकाचवेळी तीनही वास्तूंचे काम सुरू होत असून, त्यासाठी किमान वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे.
...
साहित्याचा पुनर्वापर
नगारखाना उतरवत असताना त्यातील जुने लाकडी खांब किंवा अन्य साहित्य मजबूत असतील, तर त्यांचा पुनर्वापर नव्या बांधणीमध्ये केला जाणार आहे. त्यादृष्टीने ही वास्तू उतरणे ही अतिशय क्लिष्ट व नाजूक बाब असणार आहे.
...
कोट
‘नगारखान्याचे काम पावसाळ्यात देखील सुरू राहावे, यासाठी संरक्षक पत्रे मारण्याचे काम सुरू आहे. गरूड मंडपासाठीचे लाकडी खांबही नागपुरात तयार झाले आहेत. ते मंदिरातील मापानुसार टेंबलाई टेकडी येथे आणून त्यावर नाजूक नक्षीकाम केले जाणार आहे.
- सुयश पाटील, अभियंता, देवस्थान समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com