गड- गॅसवरील वाहनावर कारवाई

गड- गॅसवरील वाहनावर कारवाई

घरगुती गॅसवरील रिक्षांवर
गडहिंग्लजमध्ये कारवाई
गडहिंग्लज, ता. ५ ः घरगुती गॅस वापरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन रिक्षांवर पोलिसांनी आज कारवाई केली. पोलिसांच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक राकेश रामदास कदम (३२, रा. काळभैरी रोड, गडहिंग्लज) व महादेव नागाप्पा चौगुले (५२, लिंगनूर कसबा नूल, ता. गडहिंग्लज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसरा चौकात ही कारवाई करण्यात आली.
कदम याची रिक्षा (एमएच ०७, एस ७०२६) व चौगुलेची रिक्षा (एमएच ०९, बीए १०५५) घरगुती स्वयंपाकाच्या गॅसवर सुरू असल्याचे सहायक फौजदार सुहास शिंदे व कॉन्स्टेबल मधुकर संकपाळ यांना समजले. त्यानुसार संबंधित रिक्षांची तपासणी केली असता पेट्रोलवरील रिक्षाच्या इंजिनमध्ये बदल करून त्यात गॅसकिट वापरल्याचे निदर्शनास आले. याद्वारे स्वतःच्या व प्रवाशांच्या जीवितास धोका उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने दोघांवरही याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com