शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

88483
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नवीन राजवाड्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात यशराजे छत्रपती यांनी शिवमूर्तीवर अभिषेक केला.
88480
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने नवीन राजवाड्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात यशराजे छत्रपती यांनी सुवर्ण शिव प्रतिमेस अभिषेक केला. यानंतर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी शिव आरती केली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत याज्ञसेनीराजे छत्रपती, मधुरिमाराजे आणि मान्यवर उपस्थित होते.

शिवरायांच्या जयघोषात न्यू पॅलेसमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा

सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात न्यू पॅलेसच्या प्रांगणात आज शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. सनईचे मंगल सूर, बेळगाव मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या पाईप बँडची धून आणि शिव शाहिरीसह कोल्हापूर पोलिस बँडच्या साथीने हा सोहळा रंगला. सोहळ्याच्या निमित्ताने नवीन राजवाड्याच्या आवारात आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. सकाळी नऊ वाजता नवीन राजवाड्यातून सुवर्ण मूर्तीचे आगमन झाले. शिवछत्रपतींच्या पारंपरिक सुवर्ण मूर्तीवर यशराजराजे यांच्या हस्ते अभिषेक झाला. कवड्याची माळ व फुले वाहून पूजन करण्यात आले. अभिषेकानंतर खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी शिवआरती केली. त्यानंतर उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. यावेळी श्रीमंत याज्ञसेनी महाराणी, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशस्विनीराजे उपस्थित होते. नागपूरचे संग्रामसिंह भोसले, रघुवीरसिंह भोसले, कल्पनाराजे भोसले, रणजीतसिंह मोहिते-पाटील, सुलक्षणाराजे मोहिते-पाटील आदींनी शिवछत्रपतींच्या मूर्तीस अभिवादन केले. राजोपाध्ये बाळकृष्ण दादर्णे यांनी राज्याभिषेक सोहळ्याचे मंत्रोपचार आदी विधी पार पाडले.
सोहळ्यासाठी आमदार जयश्री जाधव, कॅप्टन शिवाजीराव महाडकर, कर्नल अलेक्स मोहन, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, अभिजित तायशेटे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसुधा पवार, डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, मोडी लिपी तज्ज्ञ अमित अडसुळे, पुराभिलेखाधिकारी गणेश खोडके, उदय गायकवाड, सरदार घराण्यातील सदस्य ऋतुराज इंगळे, निलराजे पंडित-बावडेकर, बाळ पाटणकर, देवेंद्र खर्डेकर, संग्रामसिंह चव्हाण (हिम्मत बहाद्दर), रणवीरसिंह चव्हाण, प्रद्युम्न खर्डेकर, विजयसिंह इंगळे, प्रणिल इंगळे, उदयबाबा घोरपडे-कापशीकर, मानसिंग जाधव, शिवराजसिंह गायकवाड, माणिक मंडलिक, नंदू बामणे, विष्णू जोशिलकर, बाबा चव्हाण, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र चव्हाण, लाला गायकवाड, विक्रम जरग, संभाजीराव जगदाळे, शंकरराव शेळके, विश्‍वास कांबळे, प्रताप घोरपडे, उदय बोंद्रे, उमेश पोवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. छत्रपती शहाजी म्युझियम ट्रस्ट, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशन, छत्रपती शाहू विद्यालय व सहकारी संस्था-संघटनांतर्फे कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.
-----------------
चौकट
मर्द आम्ही मराठे खरे...
बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीचा पाईप बँण्ड व कोल्हापूर पोलिस दलाच्या बॅण्ड पथकांनी स्फूर्तिदायी गीतांचे सादरीकरण केले. या पथकांचा विशेष भेट देऊन सन्मान करण्यात आला. शिवशाहीर डॉ. आझाद नायकवडी, मनीषा नायकवडी व पथकाने शिवराज्याभिषेक पोवाड्याचे सादरीकरण केले. छत्रपती शाहू विद्यालयाच्या शिक्षकांनी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हे गीत सादर केले. तर शाहू विद्यालयाच्या एनसीसी व ‘तारा कमांडो फोर्स’ने ‘मर्द आम्ही मराठा खरे..’ हे गीत सादर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com