रंकाळ्यात पंप

रंकाळ्यात पंप

88522
कोल्हापूर ः रंकाळा तलावातील पाणी उपसून राजर्षी शाहू स्मृती उद्यानात टाकण्यासाठी पंप आणून ठेवला आहे.
.................

खणीतील मासे जगवण्यासाठी
रंकाळ्यातून होणार पाणी उपसा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः रंकाळ्यातून पाणी उपसा करून जुन्या वाशी नाक्याजवळील राजर्षी शाहू स्मृती उद्यानातील खणीत पाणी टाकण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नाला अद्याप यश आलेले नाही. खणीतील पाणी कमी झाल्याने तेथील मासे तसेच जलचरांना धोका निर्माण झाला आहे.
राजर्षी शाहू स्मृती उद्यानात खण असून, त्यात माशांचे प्रमाण भरपूर आहे. त्या खणीतील पाणी कमी होत गेले आहे. काही दिवसांपूर्वी तर पाण्याने तळ गाठल्याने मासे तसेच इतर जलचरांना धोका निर्माण झाला. त्यामुळे महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालयाने पंपाद्वारे रंकाळ्यातून त्या खणीत पाणी टाकण्याचे नियोजन केले. त्यासाठी पुराचे पाणी उपसण्यासाठी रोटरी क्लबने दिलेल्या चार पंपांपैकी एक पंप आणला. खणीजवळील रंकाळ्याच्या पाण्यात तो ठेवला; पण त्यातून उपसलेले पाणी खणीपर्यंत नेण्यासाठी पाईप पुरेशी नव्हती. तसेच त्या खणीत पाणी जाण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामध्ये काही दिवस गेले असून, आता जादाची पाईप घेतली. उद्या पुन्हा तो पंप सुरू करून पाणी खणीत टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या खणीत परिसरातील पाणी पाझरून येते. इतर मार्ग नसल्याने पावसानंतर पाणी पाझरल्यानंतर खणीतील पातळी वाढणार आहे. तोपर्यंत पंपाचा मार्ग अवलंबला जाणार आहे.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com