गर्भलिंग निदान चाचणी बातमी

गर्भलिंग निदान चाचणी बातमी

सीमाभागातील गर्भलिंग निदान
केंद्रांची तपासणी करणार : येडगे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः सीमाभागात गर्भंलिंग निदान चाचणी करणारे दवाखाने, खासगी केंद्रे असल्याची माहिती पुढे आली आहे. यासाठी कर्नाटकातील बेळगावचे जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठीचा विस्तृत आराखडा बनवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘जिल्ह्यातील मुली-मुलांचे प्रमाण व्यस्त आहे. याचे कारण गर्भलिंग निदान करण्याचे अवैध प्रकार समोर आले आहेत. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील काही दवाखाने, सोनोग्राफी मशीन असणारी छोटी केंद्र तेथे आहेत. त्यांच्या माध्यमातून अवैधपणे गर्भलिंग तपासणी केली जाते. याला आळा घालण्यासाठी बेळगावचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने सीमाभागातील अशा केंद्रांची तपासणी केली जाणार आहे. तसेच गर्भलिंग निदान चाचणीसाठी आवश्यक असणारी औषधे अवैधपणे पुरवणारे यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.’ निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, निवडणूक जिल्हाधिकारी समाधान शेडगे उपस्थित होते.

चौकट
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात
नागरिकांच्या सूचनांचा विचार

आचारसंहिता संपल्यावर अंबाबाई आणि जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नागरिकांनी सादर केलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार केला गेला आहे. त्यानुसार तयार केलेला आरखडा राज्य शासनाला सादर केला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com