शेअर मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली डॉक्टरना १ लाखांचा गंडा

शेअर मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली डॉक्टरना १ लाखांचा गंडा

डॉक्टरला एक कोटीचा गंडा
व्हॉटस् ॲपद्वारे जादा परताव्याचे आमिष; दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः गुंतवणुकीच्या तब्बल एक हजार टक्के परताव्याचा दावा करणाऱ्या विदेशी कंपनीने कोल्हापुरातील डॉक्टरला एक कोटी १० लाख ९४ हजारांचा गंडा घातला. ‘मॉर्गन स्टॅन्ले इंडिया प्रा.लि.’ अशा नावाने व्हॉटस्‌ ॲपवर चालविण्यात येणाऱ्या ग्रुपच्या नावावर काहींनी ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी कंपनीसह प्रोफेसर ध्रुव पारेख, लिंडा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत डॉ. नितीन प्रभाकर देशपांडे (वय ६०, रा. न्यू महाद्वार रोड) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
देशपांडे आर्थोपेडिक डॉक्टर आहेत. मॉर्गन स्टॅन्ले इंडिया प्रा. लि. या कंपनीचे शेअर्स खरेदीची माहिती एका व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर मिळाली होती. मार्च २०२४ मध्ये त्यांनी घेतलेल्या माहितीमध्ये गुंतवणुकीवर २० ते ८० टक्के फायद्याचे आमिष दाखवून त्यांना पैसे भरण्यास सांगण्यात आले. यानंतर ध्रुव पारेख व लिंडा या दोघांनी डॉ. देशपांडे यांना तब्बल एक हजार टक्के परताव्याचा दावा केला होता. रजिस्टर स्टॉक ब्रोकर म्हणून लिंडा हिने १६ एप्रिल ते १७ मे २०२४ या कालावधीत डॉ. देशपांडे यांच्या बॅंक खात्यातून एनईएफटीद्वारे एक कोटी १० लाख ९४ हजार ४१८ रुपयांची रक्कम वेळोवेळी घेतली.

परताव्यासाठी टाळाटाळ
मोठी रक्कम भरूनही डॉ. देशपांडेंना परताव्याची कोणतीही रक्कम मिळाली नाही. वारंवार संपर्क करूनही परतावा मिळत नसल्याने डॉक्टरांनी पोलिसांकडे धाव घेतली. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी त्यांचा जबाब नोंदवला. महाद्वार रोड येथील डॉ. देशपांडे यांच्या घरातून व्यवहार झाल्याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

मग फसविणारे कोण?
मॉर्गन स्टॅन्ले इंडिया प्रा. लि. ही एक अमेरिकास्थित नामांकित कंपनी असल्याची खात्री डॉ. देशपांडे यांनी केली होती. त्यांनी संपर्क केलेल्या संशयितांशी त्यांनी केलेले व्यवहार ऑनलाईन पद्धतीचे आहेत. तसेच त्यांना देण्यात आलेल्या खाते क्रमांकावरही गुंतवणुकीची रक्कम वाढत जाऊन १४ कोटींच्या घरात पोहोचल्याचे दिसत होते. अशात कंपनीच्या नावावर त्याच्याकडून पैसे स्वीकारणाऱ्यांचा संपर्क अचानक बंद झाला. त्यावरून गुंतवणुकीची वाढत जाणारी रक्कम भासविण्यात आल्याची शंका आली आणि आपली फसवणूक झाल्याचे डॉ. देशपांडे यांच्या लक्षात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com