बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गडहिंग्लजमध्ये सोमवारी मार्गदर्शन

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गडहिंग्लजमध्ये सोमवारी मार्गदर्शन

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी
गडहिंग्लजमध्ये सोमवारी मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. ७ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा सोमवारी (ता. १०) सकाळी साडेदहा वाजता गडहिंग्लजमधील गणेश सांस्कृतिक भवन येथे आयोजित केला आहे. मेळाव्यात उपविभागीय पोलिस अधीक्षक रामदास इंगवले (गडहिंग्लज) व शरद इंजिनिअरिंगचे प्रा. डॉ. एस. डी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
बारावी परीक्षेनंतर महाविद्यालयीन शिक्षण व करिअरची नेमकी दिशा ठरवण्यासाठीचे मार्गदर्शन मेळाव्यात मिळणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, संस्थास्तरावरील शिष्यवृत्ती, ईडब्ल्यूएस व टीएफडब्ल्यूएस याचा उपयोग, प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, सीट डिस्ट्रिब्युशन आणि श्रेणी (कॅटेगरी) आरक्षण याविषयाची माहिती मिळणार आहे. बारावीनंतरचे महाविद्यालयीन प्रवेश, उपलब्ध पर्यायांची माहिती, अभियांत्रिकी, कृषी पदवी, फार्मसी, स्पर्धा परीक्षा यांसह विविध क्षेत्रांतील मार्गदर्शन मेळाव्यात मिळणार आहे. त्याचबरोबर विविध महाविद्यालये स्टॉलसह सहभागी होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com