डेक्कन इन्स्टिट्यूट आय.डी. कोर्स साठी शिष्यवृत्ती

डेक्कन इन्स्टिट्यूट आय.डी. कोर्स साठी शिष्यवृत्ती

डेक्कन इन्स्टिट्यूट आय.डी. कोर्ससाठी शिष्यवृत्ती
कोल्हापूर, ता. ७ : डेक्कन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये द्विवर्षीय डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन व चार वर्षीय डिग्री इन बॅचलर ऑफ डिझाईन कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठीचे अर्ज मंगळवारपर्यंत (ता. २५) स्वीकारले जातील. डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन कोर्स महाराष्ट्र सरकारच्या व्होकेशनल बोर्डाव्दारे मान्यताप्राप्त असून, शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे. डिग्री इन बॅचलर ऑफ डिझाईन कोर्स शिवाजी विद्यापीठाचा मान्यताप्राप्त असून शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आहे. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग व बी. आर्च झालेल्यांना दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश आहे. शिष्यवृत्ती अॅडमिशनसाठी कमीत कमी ६० टक्के गुण आवश्यक आहे. दोन्ही कोर्स जुलैपासून सुरू होत आहेत. माहिती व प्रवेशासाठी, डेक्कन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉसमॉस कमर्शियल कॉम्प्लेक्स, तिसरा मजला, स्टेशन रोड, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com