महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क-

महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क-

तीन दक्षता पथके; १८ ठिकाणी लक्ष
पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका सतर्क

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः पावसाळा सुरू होऊ लागल्यानंतर महापालिकेने पूरस्थितीचा सामना करण्याची तयारी चालवली आहे. पाणी पातळी वाढेल तसे शहरात पूर येणाऱ्या १८ ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी तीन दक्षता पथके कार्यरत केली असून, त्यांना स्वतंत्र वाहने व विविध साधने दिली आहेत.
पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेत वॉर रूमचे नियोजन असून, विविध ठिकाणांहून पूर वा पावसासंदर्भातील तक्रारींचा निपटार केला जाणार आहे. या वॉररूमचा संपर्क क्रमांक समजण्यासाठी छोटी फोन नंबरची पुस्तिका काढण्यात येणार आहे. तसेच पूर येणाऱ्या भागातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांचा व्हॉटसॲप ग्रुप तयार केला जात आहे. त्याद्वारे पुरासंबंधीच्या विविध सूचना दिल्या जाणार आहेत. दक्षता पथकात स्थानक अधिकाऱ्यासह एक तांडेल व चार फायरमन नियुक्त केले आहेत. त्यांना स्वतंत्र वाहन दिले असून, त्यात बोट, फायबर इनर, रबरी इनर, लाईप जॅकेट, दोन, कटर मशीन आदी साहित्य असेल. पूर आल्यानंतर बाधित नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी चारही विभागीय कार्यालयांनी निवारा केंद्रांचे नियोजन केले आहे. चार कार्यालयांतर्गत २७ निवारा केंद्राची तयारी ठेवली आहे.
एकीकडे आपत्तीसाठी तयारी केली असून, दुसरीकडे पाणीपुरवठ्यासारखी यंत्रणा बंद झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणून टॅंकरचे नियोजन करून ठेवले आहे. महापालिकेचे चार टॅंकर आहेत. ते सोडून १५ खासगी टॅंकर भाड्याने घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सफाईसाठी दर आठवड्याला औषध फवारणी तर पंधरा दिवसांतून एकदा धूर फवारणी केली जाणार आहे.
.....
पाणी वाढताच देणार इशारा
अग्निशमन दलाने २०२१ मध्ये पूर आलेल्या ठिकाणांची माहिती एकत्र केली आहे. किती पाणी पातळीला कोणत्या ठिकाणी पुराचे पाणी येते हे निश्‍चित केले असून, त्याजवळ पातळी पोहचल्यानंतर अग्निशमनने कार्यरत केलेल्या तीन दक्षता पथकांकडून त्या-त्या भागातील नागरिकांना माहिती देऊन सतर्क केले जाणार आहे. तसेच इतर सहा अग्निशमन स्थानकातही यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
................
ग्राफ
धोकादायक इमारती
विभागीय कार्यालय क्रं. १ ः ५
विभागीय कार्यालय क्रं. २ ः ४०
विभागीय कार्यालय क्रं. ३ ः १६
विभागीय कार्यालय क्रं. ४ ः १३
...........
ग्राफ
एकूण धोकादायक इमारती ः७१
राहण्यास अयोग्य ः २८
रिकामी करुन दुरुस्तीयोग्य ः१४
दुरुस्ती करण्यायोग्य ः २०
किरकोळ दुरुस्ती ः १२
............................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com