फुटबॉल हंगामाबाबत खेळाडूंमध्ये संभ्रम

फुटबॉल हंगामाबाबत खेळाडूंमध्ये संभ्रम

फुटबॉल संग्रहित फोटो वापरणे...
...............
फुटबॉल हंगामाबाबत खेळाडूंमध्ये संभ्रम

लीगसह तीन स्पर्धा पार पडल्या ः एक स्पर्धा अपूर्ण, संघांनाही बसला आर्थिक फटका

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः बहुचर्चित स्थानिक फुटबॉल हंगामात के.एस.ए. वरिष्ठ लीगसह केवळ तीन स्पर्धा पार पडल्या आहेत, तर अंतिम सामन्यातील एक स्पर्धा अजूनही निकालाअभावी अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे खेळाडूंसह फुटबॉलप्रेमींमध्ये हंगामाबाबत संम्रभ निर्माण झाला आहे. पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने लीगसह दोन, तर शिवाजी तरुण मंडळने एक स्पर्धा जिंकली आहे. एका स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघानेही उपविजेतेपद मिळवले.
हंगामाची सुरुवात श्रीमंत शाहू छत्रपती के.एस.ए. लीग वरिष्ठ गट ‘अ’ स्पर्धेने झाली. स्पर्धेत सुपर आठ आणि वरिष्ठ गट आठ अशा १६ संघांत प्रत्येकी सात सामन्यांप्रमाणे ११२ सामने झाले. यात पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने प्रथम, तर शिवाजी तरुण मंडळने द्वितीय स्थान पटकावले. हंगामातील दुसरी के.एम. चषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत यजमान खंडोबा तालीम मंडळाला पराभूत करीत शिवाजी तरुण मंडळने विजेतेपद पटकावले. यानंतर सतेज चषक फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेनंतर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामना शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) यांच्यात झालेल्या वादावादीनंतर अपूर्ण अवस्थेत राहिला. या सामन्यांनतर पोलिस प्रशासनाने परवानागी नाकारल्यानंतर या सामन्याला मुहूर्तच लागेना. त्यानंतर लोकसभा निवडणुका आचारसंहिता लागू झाली. मतदान, मतमोजणी आणि निकालही लागला. मात्र, हंगाम काही सुरू झाला नाही. त्यामुळे हंगाम संपला की नाही, याबाबत खेळाडूंसह फुटबॉलप्रेमींमध्ये संम्रभ निर्माण झाला आहे.
................
खेळाडूंसह संघांचे नुकसान
यंदाच्या हंगामासाठी अनेक संघांनी जिल्ह्यासह स्थानिक खेळाडूंना करारबद्ध केले होते. मात्र, तीन स्पर्धांनंतर हंगाम अपूर्ण स्थितीत राहिला. त्यामुळे अनेक खेळाडूंना आर्थिक फटका बसला. विशेषतः संघाला तिकीट विक्रीतून मिळाणारा वाटाही अत्यल्प मिळाला. त्यामुळे खेळाडूंवर संघांनी केलेला खर्चही निघाला नाही. लीग स्पर्धेत सुमारे १० लाख, तर के.एम. चषक स्पर्धेत २ लाख ७५ हजार, तर सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत साडेतीन लाख आणि शिवशाहू स्पर्धेत ३ लाख २० हजार असे एकूण १९ लाख ४५ हजार रुपये तिकीट विक्रीतून जमले. त्यातील काही वाटा संघांनाही दिला जातो. मात्र, पुढील स्पर्धा न झाल्याने हा वाटा अत्यल्प मिळाला.
....
या खेळाडूंचाच वरचष्मा
पाटाकडील (अ) कडून आदित्य कल्लोळी, प्रथमेश हेरेकर, ओंकार पाटील, ओंकार मोरे, अरबाज पेंढारी, यश देवणे, अक्षय पायमल यांनी, तर शिवाजी तरुण मंडळकडून संकेत साळोखे, संदेश कासार, योगेश कदम, करण चव्हाण-बंदरे आणि खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघाकडून संकेत मेढे, कुणाल दळवी, प्रभू पोवार, गोलरक्षक अरेंदू दत्ता यांचा खेळ लक्ष्यवेधी ठरला.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com